बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खान रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saif Ali Khan Admit

सैफ अली खान रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यापासून त्याचे चाहते विविध प्रकारचे अंदाज लावताना दिसत आहेत. शूटिंगदरम्यान जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ही समोर आले आहे. सूत्रांच्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्याच्या गुडघ्यावर व खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचा खांदा व गुडघा फ्रॅक्चर झाला असल्याचं समोर आलं. (Saif Ali Khan Admit)

दरम्यान मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सैफ अली खानला दाखल करण्यात आले. तेथेच त्याच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली. अभिनेत्री करीना कपूर पतीबरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती. ‘आज तक’च्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, ‘अभिनेत्याला अचानक शस्त्रक्रियेची फारशी गरज नव्हती. तो ही शस्त्रक्रिया पुढे ढकलत होता. अभिनेत्याची दुखापत फारशी गंभीर नाही. तो आता निरोगी आहे. काळजी करण्यासारखे आता काही कारण नाही.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : आयेशा खाननंतर ‘हा’ स्पर्धकही पडला घराबाहेर, अंकिता-विकी झाले भावुक, अभिषेक कुमारलाही अश्रु अनावर

सैफ अली खानने त्याच्या चाहत्यांचे आभार व्यक्त करत आपली शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता यापूर्वीही जखमी झाला होता. मागे ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. त्यावेळी अभिनेत्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता अभिनेता सैफ अली खान पुन्हा जखमी झाला असून त्याचा खांदा व गुडघ्याला फ्रॅक्चर झाले असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – “त्यात काही…” स्पृहा जोशीच्या ब्लाऊजवरील ‘त्या’ फोटोवरुन झालेल्या गदारोळावर अभिनेत्रीने आता केला खुलासा, म्हणाली “मला सतत…”

सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सैफ अली खान चित्रपटांमधील भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. २०२३ मध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या भूमिकेमुळे तो विशेष लोकप्रिय झाला. याशिवाय तो आगामी तेलुगू चित्रपट ‘देवरा’ व हिंदी चित्रपट ‘गो गोवा गॉन’ मध्ये दिसणार आहे.

Tags: saif ali khan admitsaif ali khan and kareena kapoorsaif ali khan healthsaif ali khan health update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sshura Khan Baby Bump
Entertainment

अरबाज खान होणार बाबा, पत्नी शुराचा बेबी बंब पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद, काळजीपूर्वक पाऊल टाकतानाही दिसली आणि…

जून 4, 2025 | 1:14 pm
avantika malik on divorce with imran khan
Entertainment

“मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जून 4, 2025 | 12:56 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

कॅन्सरमुळे निधन झालेल्या अभिनेत्याच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, सिनेसृष्टीतील जवळच्या मित्राने दिला खांदा, आजारपणातही केली होती आर्थिक मदत

जून 4, 2025 | 12:34 pm
Gurmeet Choudhary On Robbery
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच केला विश्वासघात, अभिनेता म्हणाला, “मुली सुखरुप आहेत पण…”

जून 4, 2025 | 11:51 am
Next Post
Alia bhatt Traditional Attire

आलिया भट्टच्या साडीवरील 'रामायण'ने वेधलं लक्ष, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.