अखेर रामराज्य आलं. २२ जानेवारी (सोमवार) रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा दिवस प्रत्येक भारतीयांने दिवसाला सणासारखा साजरा केला. यावेळी मंदिरातील पूजेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक भारतीयांसाठी दाखवण्यात आले होते. यावेळी देशातील अनेक मान्यवर रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनेसाठी हजर होते. दरम्यान या कार्यक्रम सोहळ्याला अनेक सिनेतारकांनी व दिग्गज मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Alia bhatt Traditional Attire)
अभिनेत्री आलिया भट ही देखील पती रणबीर कपूरसह मुंबईहून अयोध्येला रवाना झाली. अयोध्येतील या खास सोहळ्यासाठी आलिया भट्टच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी आलिया हिरव्या रंगाच्या प्लेन बॉर्डरच्या साडीत दिसली. पण आलियाची ही साधी दिसणारी साडी खूप खास असल्याचं समोर आलं. आलिया भट्टने या खास दिवसासाठी ही साडी निवडली होती. या साडीकडे बारकाईने पाहिले तर संपूर्ण रामायण या साडीच्या काठावर चित्रांच्या माध्यमातून कोरले गेले होते.
प्राण प्रतिष्ठा उत्सवात आलिया भट्ट तिच्या या खास अंदाजातील साडीत दिसली. या साडीबरोबरच अभिनेत्रीने याच रंगाच्या मात्र किंचित गडद अशी शालही घेतली होती. आलियाने नेसलेल्या या साडीत तिचा मनमोहक अंदाज विशेष भावला. आलियाबरोबरच कतरिना कैफही गोल्डन साडीत या सोहळ्यादरम्यान पोहोचली होती. कतरिना व विकी यांची जोडी ही लक्षवेधी ठरली. दोघांच्या पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कतरिना कोणत्याही मेकअप लूकमध्ये दिसली नाही. शिवाय ती कमीतकमी दागिन्यांमध्ये दिसली.
आणखी वाचा – सैफ अली खान रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला…
ज्या संधीची देशातील लाखो भक्त आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी अखेर सोमवारी दिनांक. २२ जानेवारी २०२४ रोजी आली. वर्षानुवर्षे मंडपात बसलेल्या श्री रामलल्लाची अखेर राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने देशभरात आनंदाची लाट उसळली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.