१६ जानेवारी रोजी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला आणि अवघ्या कलाविश्वाला धक्का बसला. हल्ल्यानंतर अभिनेता गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर याप्रकरणी तात्काळ तपास सुरु झाला आहे. पोलिसांनी शरीफुल शहजाद याला अटक केली आहे. पण त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेला नाही. अशातच आता त्याच्याबद्दल आणखी काही खुलासे समोर येते आहेत. पण सीसीटीव्हीमध्ये दाखवलेल्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा जुळत नसल्याचे आरोपीच्या वकिलाचे म्हणणं आहे. आता पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा नवा मार्ग शोधला आहे. प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी पुरावा जमा करण्यास सुरुवात केली आहे. (Saif Ali Khan attacker fingerprints)
वास्तविक, पोलीस तपासात मोठा खुलासा झाला आहे. त्यानुसार आरोपी शरीफुल इस्लामसोबत अन्य आरोपी असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील नवा ट्विस्ट म्हणजे आरोपीचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांना आहे. पोलिसांनी सैफच्या घरातून ५० हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेतले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपींच्या बोटांचे ठसे जुळण्याबाबत मौन बाळगले आहे.
आणखी वाचा – पूजा सावंतच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, युनिक टोपण नावाने मारतो हाक, म्हणाला, “तुझ्या हास्यामुळे…”
लिलावती रुग्णालयातील अभिनेत्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला आहे. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सैफ अली खानच्या लीलावती हॉस्पिटलमधून पोलिसांना पाठवण्यात आलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये फॅमिली फ्रेंडच्या कॉलममध्ये फक्त ऑफिसर जैदीचे नाव आणि नंबर लिहिलेला आहे. १६ जानेवारीला सकाळी सैफ अली खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर यांचा समावेश आहे.