बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’चा ट्रेलर २२ जानेवारीला प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. यातूनच एक नवा वादही निर्माण झाला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांवर शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आहे. ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. त्याचबरोबर ट्रेलरमधील एक डायलॉगही अनेकांना पटला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच आता ‘छावा’बद्दल एका मराठी अभिनेत्यानेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे आणि हा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. (Ajinkya Raut Vicky Kaushal Chhaava movie)
एका चाहत्याने अजिंक्यला “विकी कौशलच्या ‘छावा’च्या ट्रेलरबद्दल तुमचं मत काय आहे?” असा प्रश्न विचारला, चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत अजिंक्यने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मस्त, ट्रेलर तर खूपच कमाल आहे. विकी कौशल एक उत्तम अभिनेता आहे. पण महाराजांची भूमिका करण्यासाठी मला वाटतं एका मराठी अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली असती तर आणखी बरं झालं असतं. कारण महाराजांची भूमिका एका मराठी अभिनेत्याने साकारली असती तर बरं झालं असतं”.
आणखी वाचा – पूजा सावंतच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, युनिक टोपण नावाने मारतो हाक, म्हणाला, “तुझ्या हास्यामुळे…”
यापुढे तो असं म्हणाला की, “आपण मराठी कलाकार म्हणून किंवा मराठी इंडस्ट्री म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत असं वाटतं लहान तोंडी मोठा घास पण मराठी प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा एक प्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की, त्याठिकाणी अशी कुणी व्यक्ती असली असती. किंवा माझी अजूनही इच्छा आहे की इथून पुढे तरी कुणी तरी असं यावं की जो तिथे प्रतिनिधित्व करु शकेल, ज्या मराठी भूमिका आहेत. जसं की चंदू चॅम्पियन, मुंज्या… शिवाय महाराजांची भूमिका असो”.
आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप
दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी, रश्मिकासह अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘छावा’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.