बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर शाहिदने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. सध्या तो त्याचा बहूचर्चित चित्रपट ‘देवा’मुळे अधिक चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर पूजा हेगडेदेखील दिसून येणार आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरच तो खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेला दिसून येतो. करीना कपूर व प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चादेखील अधिक चर्चा रंगल्या होत्या. मात्र २०१५ साली तो मीरा राजपूतबरोबर लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. (shahid kapoor on marriage)
शाहिदने एका मुलाखतीमध्ये त्याच्या व मीरामध्ये असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्याने लग्नाबद्दल बोलला आहे. लग्न म्हणजे एक कठीण गोष्ट आहे. अचूक लग्न असे काहीही नसते असेही तो म्हणाला. शाहिद राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने अचूक म्हणजेच परफेक्ट लग्न म्हणजे चुकीचे मार्गदर्शन म्हणायला हरकत नाही. यामुळे अनेक आशा वाढतात असे तो म्हणाला.
याबद्दल शाहिद म्हणाला की, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफेक्ट लग्न असं काहीही नसतं. यातील पहिला नियम म्हणजे हा एक असा प्रवास आहे ज्यामध्ये एकमेकांना समजण्याची, स्वीकारण्याची व आदर करण्याची गरज आहे. कोणत्याही लग्नामध्ये या गोष्टी खुप महत्त्वाच्या असतात. जर मला या सगळ्याची काळजी असेल किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल आणि माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते असेल तर हे एक निरोगी लग्न असते”.
आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा
पुढे तो म्हणाला की, “माझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे जर मी त्यावर लक्ष केंद्रित करत असेन पण तुम्ही तुमच्या पार्टनरला हे समजावण्यासाठीच प्रयत्न करत असाल तर समजा की तुमचे हे लग्न चालणार नाही. याचा तुमच्या वैवाहिक आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मी व मीरा आमचे रस्ते खूप वेगळे आहेत. आमची रुची वेगवेगळ्या विषयांमध्ये आहे. मीरा मुलांना सांभाळते. त्यांच्याकडे लक्ष देते. पण मुलांबद्दल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकमेकांना विचार सांगतो”. मीरा व शाहिद यांच्या १० वर्षांचा प्रवास खूप आनंदात सुरु आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व व्हिडिओदेखील बघायला मिळतात.