कपिल शर्मा शोमध्ये कपिल नेहमी त्याच्या अर्चना पूरन सिंह यांची मजा-मस्करी करताना दिसतो. अर्चनाही हे सर्व अगदीच मजेत घेतात आणि त्या हे सर्व मनापासून एन्जॉय करतात. अशातच कायम हसमुख असणाऱ्या अर्चना यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सेटवर त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापतही झाली आहे. अर्चना यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. अर्चना पूरण सिंहने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिला झालेली दुखापत दाखवली आहे. (Archana Puran Singh accident)
राजकुमार रावबरोबर एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अर्चना घसरल्यास आणि त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या असून कामावरदेखील पुन्हा परतल्या आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यांची प्रकृती कशी आहे ते सांगितले आहे. त्यांनी एका व्लॉगद्वारे त्यांच्या अपघाताबद्दल सांगितले. व्लॉगची सुरुवात अर्चना पूरण सिंगने तिला झालेल्या दुखापतीच्या फुटेजपासून सुरुवात केली.
आणखी वाचा – “त्याने खांद्यावर हात ठेवला तेव्हा…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “एक मुलगी म्हणून…”
यात त्या कॅमेऱ्यापासून दूर असताना, सेटवरील एका व्हिडीओमध्ये त्या पडताना दिसल्या. त्यानंतर लगेचच, क्रू मेंबर्स जमले आणि त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. अर्चना यांचे पती परमीत सेठी यांनाही लगेच कळवण्यात आले. मग त्यांच्या मुलांनीही बातमीवर प्रतिक्रिया देताना एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि त्यातला एक जण रडू लागला. अर्चना यांनी तयांचया हॉस्पिटलच्या खोलीबाहेरचे दृश्य दाखवले. यावेळी त्यांनी खूप आनंदी आहे पण मला माझे काम अपूर्ण ठेवता येणार नसल्याचेही सांगितले.
पुढे त्यांनी असंही सांगितले की, त्यांनी पहिल्या दिवशी व्हिडीओ बनवू दिला नाही कारण त्या खूप शॉकमध्ये होत्या. मात्र नंतर रेकॉर्डला परवानगी देण्यात आली. यावेळी अर्चना यांचा नवरा म्हणाला, ‘ती खूप बडबड करते आहे, याचा अर्थ ती आता बरी आहे”. दरम्यान, अर्चना यांच्या मनगटावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या आता बऱ्या आहेत. या सगळ्यातून बाहेर येताच त्या लवकरच कामावरदेखील परतणार आहेत. याबद्दल त्यांनी स्वतः चाहत्यांना माहिती दिली आहे