‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कलाकारांचे भन्नाट विनोदी स्किट्सचे लाखो चाहते आहेत. काही काळ महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने चाहत्यांचा निरोप घेतला होता. बर निरोप घेऊनही हास्यजत्रेची टीम काही शांत बसली नव्हती, ती परदेश दौरा करण्यात व्यस्त होती. अमेरिका आणि कॅनडा येथील प्रेक्षकांना हास्यजत्रेचे कलाकार हसवायला सज्ज झाले होते. आता मात्र हास्यजत्रेचे कलाकार परदेश दौरा करून परत आले असून ते १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहेत. (Saie Tamhankar MHJ)
१४ ऑगस्टपासून कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार असून कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यानिमित्त अभिनेत्री सई ताम्हणकर हिने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने कित्येक दिवसांनी भेटल्याने हास्यजत्रेतील कलाकारांना पाहून तिला आनंद झाला असल्याचं समोर आलं. दरम्यान सईने स्वतः इंस्टाग्राम लाईव्ह येत हास्यजत्रेतील कलाकारांना भेटून आनंद व्यक्त केला.
पाहा भेटीदरम्यान हास्यजत्रेतील कलाकार काय म्हणाले (Saie Tamhankar MHJ)
सईने इंस्टाग्राम लाईव्ह येत सगळ्या कलाकारांना भेट दिली आहे. सुरुवातीला तिने अभिनेता प्रसाद ओकची भेट घडवून दिली. प्रसादने कार्यक्रम १४ ऑगस्टपासून येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर सईने प्राजक्ता माळीची भेट घडवली. बरं या भेटीदरम्यान सईने प्राजक्ताच अभिनंदन केलं. यांत तिने म्हटलं की, “प्राजक्ताने नवं फार्महाउस खरेदी केलं असल्याने तीच कौतुक आहेच आणि मला तिचा प्रचंड अभिमान वाटतोय.त्यानंतर सईने हास्यजत्रेतील कलाकारांची भेट घडवली. दरम्यान सगळेच कलाकार रिहर्सल, वा तयारी करताना दिसत होते. समीर चौघुले याची पण तिने भेट घेतली तेव्हा, ते म्हणाले की परदेश दौरा खूप मस्त होता, पण अजूनही दौऱ्या निमित्त झालेली दगदग जाणवतेय, प्रवासामुळे पाठ दुखतेय.
हे देखील वाचा – “तुम्हाला याबद्दल जाणून घेण्याची काही गरज नाही..” वडिलांच्या निधनावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलरवर भडकला गश्मीर महाजनी
आता १४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – सहकुटुंब हसू या!” या थीमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
