बॉलीवूड आणि साऊथ मधले सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे.सिनेसृष्टीमध्ये त्यांची अशी वेगळी स्टाईल पाहायला मिळते.त्यांच्या ज्या चित्रपटाची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे, ‘जेलर’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.या चित्रपटाच्या निमित्त पार पडलेल्या एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बऱ्याच गोष्टींबाबत त्यांनी सवांद साधला, तेव्हा त्यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल देखील वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं. (rajinikanth on alcohol)
पाहा काय म्हणाले राजनीकांत? (rajinikanth on alcohol)
रजनीकांत म्हणाले, जर दारू माझ्या आयुष्यात नसती तर मी समजा प्रति काही तरी करू शकलो असतो, दारूचं व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे.मी असं नाही म्हणत की दारू पूर्णपणे सोडून द्यावी, परंतु त्याच्या आधीन ही जाऊ नये.याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर व आनंदावर होतो.

याआधी देखील अभिनेते रजनीकांत यांनी ‘चारुकेसी’ या तमिळ नाटकाच्या एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती,तेव्हा त्यांनी दारूच्या व्यसनातून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांच्या पत्नीचे आभार मानले होते, तसेच ते म्हणाले, ‘मी वाईजी महेंद्रन यांचा कायम आभारी असेन’. ते जेव्हा कंडक्टरची नोकरी करायचे तेव्हा त्यांच्या दिवसाची सुरुवात दारूने व्हायची आणि ते किती सिगरेट प्यायचे याची काही गिनती नव्हती. दररोज मांसाहार खायचे. अशा बऱ्याच चुका तेव्हा झाल्या. (rajinikanth on alcohol)
हे देखील वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या दिग्गज नटांचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का
त्यांच्या मते, जे लोक मोठ्या काळासाठी दारू, सिगरेट, मांसाहार यांचं सेवन करतो तो व्यक्ती वयाच्या ६०व्या वर्षानंतर आरोग्यदायी जीवन जगू शकत नाही. माझी पत्नी लतामुळे माझं जीवन रुळावर आलं. त्यांच्या आगामी चित्रपटात जेलरमध्ये त्यांनी मुथुवेल पांडियन ही दमदार भूमिका साकारली आहे.तसेच या चित्रपटात रजनीकांत यांच्या सोबत तमन्ना भाटिया, शिवा राजकुमार, जैकी श्रॉफ, मोहनलाल, योगी बाबू असे अनेक कलाकार झळकणार आहेत.