महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. जगभरात या हास्यजत्रेचे असंख्य चाहते आहेत. अशातच या कार्यक्रमाने स्वतःच स्थान अद्याप टिकवून ठेवलंय. या कार्यक्रमातील कलाकारांनी आजवर स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना जोडून ठेवलंय. कार्यक्रमातील सर्वच कलाकारांसोबत प्रेक्षक या कार्यक्रमाच्या परीक्षकांवरही तितकंच भरभरून प्रेम करतात. सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे या कर्कर्माचे चाहते आहेत. बरेचदा स्किट दरम्यान हे परीक्षकही स्किटचे भाग होतात.(saie tamhankar samir choughule)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्क्रमाचे महारथी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे समीर चौघुले. समीरने आजवर त्याच्या विनोदाचा अचूक टायमिंगने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काल समीर चौघुलेंचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व कलाकार मंडळींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काल सोशल मीडियावरही समीरच्या वाढदिवसाच्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची परीक्षक अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील समीरला हटके शुभेच्छा देत त्याची पोस्ट सोशल मीडियावरून पोस्ट केली आहे.
पाहा सईने दिली समीरला भेटवस्तू (saie tamhankar samir choughule)
सईने समीरला शुभेच्छा देणारी एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. यांत सईने त्याला हटके शुभेच्छा देत गिफ्ट सुद्धा दिल आहे. सईने समीरसोबतचा एक फोटो पोस्ट केला असून यांत तिने त्याला एक tshirt गिफ्ट केलेलं आहे. समीरला सईने गिफ्ट म्हणून दिलेल्या tshirt वर जुजबी असं लिहिलेलं दिसतंय. सईने शेअर केलेला हा फोटो समीरने ही त्याच्या अकाउंटवरून रिपोस्ट केला आहे.(saie tamhankar samir choughule)
हे देखील वाचा – वजन जास्त असल्यामुळे पूजाला पडलं ‘हे’ नाव
सईशिवाय समीरला हास्यजत्रेतील अनके कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. प्रसाद ओक याने देखील समीरला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली आहे. शिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रेचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे सचिन गोस्वामी यांनी समीरला त्याच्याच अंदाजत हॅम्रेको तुमरेको म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने समीरला दिलेल्या शुभेच्छांसोबत त्याखाली दिलेलं कॅप्शन अधिक लक्षवेधी ठरतंय. मी तुझ्या वाह दादा वाह मुळे फेमस झाले असं म्हणत पोस्ट केली आहे.
