मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या अनेक दमदार अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या आणि सौंदर्यच्या जोरावर आपलं असं एक स्थान निर्माण केलं आहे.या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री पूजा सावंत हीच नाव नक्कीच येत.आपल्या सहज,सोज्वळ अभिनयाने पूजाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.अभिनय, नृत्य, निवेदन अशा सगळ्या रुपांत पूजा पाहायला मिळाली.(Pooja Sawant Nickname)
क्षणभर विश्रांती, झकास,दगडी चाळ, भेटली तू पुन्हा,लपाछपी अशा अनेक चित्रपटांतून पूजाने प्रेक्षकांचं मन जिंकलं.प्रत्येक भूमिकेचं वेगळपण जपण्याचा प्रयत्न कायम पूजा करते. अंडी हेच तिच्या कामच यश आहे असं नक्कीच म्हणता येईल.सध्या पूजाचा पोश्टर बॉईज २ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .तिच्या या नव्या भूमिकेसाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.
पाहा काय आहे पूजाच्या टोपणनावाचा किस्सा? (Pooja Sawant Nickname)
जितकं कलाकारांच्या कामावरती प्रेक्षकांचं प्रेम असत, कलाकरांना नवं नवीन भूमिकांमध्ये पाहायला प्रेक्षक जितके उत्सुक असतात तितकेच प्रेक्षक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात देखील उत्सुक असतात.कलाकारांचा स्ट्रगल जितका महत्वाचा असतो तितकंच त्यांचं बालपण देखील जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडत, प्रत्येकासाठी त्याच बालपण खास असत,आणि या बालपणात अनेकांना त्यांची टोपणनाव मिळतात.टोपणनाव म्हंटल कि फार गोड नाव आपल्या डोक्यात येतात. परंतु पूजाच टोपणनाव फार मजेशीर आहे,तिला घरी बोजा असं म्हणतात.तिच्या या टोपणनावाचा किस्सा देखील फार गमतीदार आहे जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात

पूजाला एका मुलाखतीत तीच टोपनांव विचारण्यात आलं. तेव्हा तिने सांगितलं की तिला घरी बोजा असं म्हणतात,या मागचा किस्सा असा आहे की, वाडिया हॉस्पिटल मध्ये तिचा जन्म झाला.तिच्या जन्माच्या वेळी ती साडे दहा पाउंडची होती आणि त्या वर्षातील सगळ्यात हेल्दी बाळ म्हणून पूजाचा रेकॉर्ड आहे वाडिया हॉस्पिटल मध्ये आणि त्यानंतर पूजाच वजन वाढत गेलं.ती जड असल्यामुळे तिला कोणी उचलून घ्यायचं नाही.आणि त्यावेळेस पूजाचा मामा पूजाच्या आईला म्हणाला होता की काय बोजा आहे हा. तिथूनच पूजाच नाव बोजा असं पडलं. नंतर सगळे चिडवायला लागले म्हणून पूजाने ते नाव आता बोजू असं केलं. आता पूजाचा फिटनेस आणि व्यक्तिमत्व बघता हा किस्सा फार गमतीदार वाटतो.(Pooja Sawant Nickname)

हे देखील वाचा : ‘तुझ्यामुळे मी फेमस झाले’-प्राजक्ताच्या समीरला हटके शुभेच्छा