अभिनेत्री सई ताम्हणकरला मराठी सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सईने ‘सनई चौघडे’, ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘दुनियादारी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ती इथवर थांबली नाही, तर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. अभिनय क्षेत्राबरोबर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिच्या व्हिडिओज आणि फोटोशूटची नेहमीच चर्चा होत असते. अशातच, अभिनेत्रीच्या एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (Sai Tamhankar Dance Video)
सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम व चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचबरोबर, ती अनेक जाहिरातींचे शूटदेखील करत असते. यादरम्यानचे अनेक फोटोज व व्हिडिओज ती नेहमी तिच्या चाहत्यांसह शेअर करत राहते. अश्याच एका शूटमधील एक व्हिडिओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला.
हे देखील वाचा – वनिताला म्हटलं खादाड, मोठा शहाणा कोण हेही सांगितलं?, निखिल बनेने ‘हास्यजत्रे’च्या कलाकारांची केली पोलखोल, म्हणाला, “समीर दादा…”
सईने नुकतंच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कारवर उभी राहत भररस्त्यात एका गाण्यावर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तसेच, तिच्यासह काही कलाकार देखील थिरकताना यात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ एका शूटमधील असून ती नेमकं कोणत्या चित्रपटाचं शूट करते? हे मात्र कळलेलं नाही. दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणाली, “मी एक चांगला टेक साजरा करत आहे!”. सईचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहे.
हे देखील वाचा – “दोन ते अडीच हजार केस कापायला द्यायचो अन्…”, ‘आई कुठे…’मधील अनिरुद्धची पोस्ट, म्हणाले, “खूप मोठा प्रश्न…”
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं गेल्यास, ती लवकरच सिद्धार्थ चांदेकरबरोबर ‘श्रीदेवी प्रसन्न’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. शिवाय, ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेतही दिसत आहे. नुकतंच तिने मुंबईत आलिशान घर घेतलं असून त्याचीदेखील बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर, नुकतंच तिने स्वतःच युट्युब चॅनेल सुरु केलं असून याद्वारे तिने तिच्या नवीन घराची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. पण, ती गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. त्यामुळे चाहते तिला पुन्हा या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरलेले आहेत.