छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा अनेकांच्या घरी पाहिला जाणारा लोकप्रिय कार्यक्रम. तुफान विनोदी स्किट्स व कलाकारांचे अफलातून अभिनय यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला. या कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. तसेच, नव्या दमाच्या अनेक कलाकारानांही नवी ओळख मिळाली आहे. अभिनेता निखिल बनेलाही याच कार्यक्रमामुळे बरीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमानंतर त्याला अनेक चित्रपट व मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. (Nikhil Bane Majja Polkhol)
निखिल बने सध्या ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या मालिकेत नुकताच झळकला आहे. तो यामध्ये चोराची भूमिका साकारताना दिसत आहे. यावेळी ‘इट्स मज्जा’ने निखिलसह ‘मज्जा पोलखोल’ नावाचा खेळ खेळला होता. ज्यामध्ये त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांची पोलखोल केली आहे. तसेच, त्याने हास्यजत्रेच्या सेटवरील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
हे देखील वाचा – निखिल बनेचं झालं आहे ब्रेकअप, पहिल्यांदाच केलं भाष्य, क्रशबाबतही केला खुलासा, म्हणाला, “ती स्वतःहून मला भेटायला आली अन्…”
यावेळी निखिलने वनिता खरातचा “प्रेमाने खादाड” असा उल्लेख केला आहे. तो म्हणाला, “वनिता तशी खादाड नाही. पण ती तिच्या खाण्यावर खूप नियंत्रण करते, डायटदेखील व्यवस्थित करते. मात्र, तिला विविध पदार्थ खाण्याची प्रचंड आवड आहे. तसेच, तिला केक खाण्याची जास्त आवड आहे. त्यामुळे मी तिचा ‘प्रेमाने खादाड’ असं म्हणतो.” तर ईशा डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर ‘लेट करंट’ असल्याचे सांगताना एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आम्ही सर्व जण जेव्हा एकत्र असतो. तेव्हा त्यावेळेस एक गंमत घडते. पण, हे त्यांना पटकन कळलेलं नसतं. मात्र त्या दोघी आम्हाला कळलेलं असल्याचं दाखवतात. त्यानंतर मी त्यांना जाऊन विचारतो की, “खरंच तुम्हाला काही कळलं का?” त्यावर त्या नाही म्हणतात आणि “त्यावेळेस नक्की काय झालं?” असं त्या आम्हाला विचारतात.
हे देखील वाचा – Video : ऋतुजा बागवेने खरेदी केलेलं नवीन घर आतून नेमकं कसं आहे?, बेडरुम आहे फारच खास, पाहा व्हिडीओ
तर सेटवर ‘आला मोठा शहाणा’ असलेली व्यक्ती कोण आहे? असं विचारला असता तो म्हणाला, “यामध्ये आमच्यातील कोणताही कलाकार नाही. मात्र, हे बघताना मला ‘चल… मोठ्ठा शहाणा’ किंवा ‘चल… मोठ्ठी शहाणी’ हा समीर चौघुले यांच्या स्किटमधील डायलॉग मला आठवला. मी हे कोणालाच हे नाही म्हणत, मात्र समीरदादाच्या तोंडून हा डायलॉग गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळाला नाही. कारण, ज्या पद्धतीने ते हा डायलॉग बोलतात, त्याच्यात खरी गंमत आहे. त्यामुळे मला त्यांच्या तोंडून ‘चल… मोठ्ठा शहाणा’ किंवा ‘चल… मोठ्ठी शहाणी’ हा डायलॉग ऐकण्याची मनापासूनची इच्छा आहे”, असं निखिल यावेळी म्हणाला. निखिल सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ या मालिकांमध्ये दिसत असून लवकरच त्याचा ‘बॉईज ४’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.