बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तेव्हा चिपळूण सोडून मुंबईत आले अन्…”, आई-वडिलांपासून कित्येक वर्ष दूर राहणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “७ वर्ष…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sahkutumb sahparivaar serial fame sakshi Gandhi shared photo with her family with post see the details

"तेव्हा चिपळूण सोडून मुंबईत आले अन्…", आई-वडिलांपासून कित्येक वर्ष दूर राहणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, "७ वर्ष…"

अभिनय क्षेत्रात नशीब आजमावायला आलेल्या अनेक कलाकारांना काही संघर्षांना सामोरे जावे लागते. मराठी मनोरंजनसृष्टी ही मुंबईत आहे. मनोरंजन सृष्टीतील बहुतांश कामे ही मुंबई शहराशी निगडीत आहेत. त्यामुळे अनेक होतकरू कलाकार या क्षेत्रात येण्यासाठी आपले घरदार सोडून येतात आणि हा संघर्ष प्रतीक कलाकाराच्या वाट्याला येतोच. अशा संघर्ष करणाऱ्या होतकरू व नवीन कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी. (Sakshi Gandhi On Instagram)

स्टार प्रवाह वहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी. हे मालिका संपून आता बरेच दिवस पार पडले असले तरी या मालिकेची क्रेझ अजूनही कायम आहे. या मालिकेत साक्षीने अवनी ही नकारात्मक भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. अशातच तिच्या या अभिनय क्षेत्रातल्या संघर्षावरुन साक्षीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये साक्षीने तिच्या आई-वडिलांविषयी भावुक पोस्ट करत असे म्हटले आहे की, “मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात… आपल्या कुटुंबापासून दूर राहतात… महिनों-महिने एकमेकांची भेट होत नाही किंवा एकमेकांना पाहताही येत नाही.. कॉलवर फक्त आवाज ऐकावं लागतो. चिपळूण सोडून घरच्यांपासून दूर मुंबईत आले त्याला आता ७ वर्षे झाली. खूप मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. का? तर आयुष्यात स्थिरस्थावर व्हायचं असतं म्हणून. पण आपण आयुष्यात खरचं कधी स्थिरस्थावर होतो का?”

View this post on Instagram

A post shared by साक्षी महेश गांधी ???? (@gandhisakshee_)

आणखी वाचा – लग्नानंतर प्रथमेश लघाटेचा एकट्याने विमान प्रवास, बायकोच्या आठवणीत व्याकुळ, विमानातला फोटो पोस्ट करत म्हणाला, “मुग्धा…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपण कामासाठी इतके धावत असतो की, अनेक दिवस घरी दोन मिनिटांचा कॉलसुद्धा करता येत नाही. आई-वडिलांच्या जीवाची घालमेल होत नसेल का? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का? त्यांच्या घशाखाली एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का? हा विचार करुन त्रास होतो. पण सहज उठून जाताही येत नाही आणि तेव्हा खऱ्या अर्थाने घराची ओढ वाटते.”

आणखी वाचा – “उगाच माझ्या जीवाशी खेळ का?”, बायको गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, भडकून म्हणाली, “लगेचच डिलीट…”

साक्षीने तिचा आईवडिलांबरोबरचा एक फोटो शेअर करत “आई, पप्पा, क्षितू, तुम्हाला खूप दिवस झाले पाहिलं नाही आहे. पण आपण लवकरच भेटू.” असं म्हटलं आहे. दरम्यान साक्षीच्या या पोस्टखाली रेश्मा शिंदे, विदिशा म्हसकर, अपूर्व रांजणकर, प्राणिता आचरेकरे, त्रिशूल मराठे आदी कलाकारांसह अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssakshi gandhiमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनसाक्षी गांधी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच अंकिता लोखंडे व विकी जैन घेणार घटस्फोट?, म्हणाला, "कृपया हे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.