बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 8, 2025 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akash nalawade news

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज

akash nalawade news : मराठी कलाविश्वात अशी काही कलाकार मंडळी आहेत ज्यांनी लग्नाच्या, साखरपुड्याच्या, आई-बाबा झाल्याच्या वा आई-बाबा होणार असल्याच्या आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. ही कलाकार मंडळी त्यांचा आनंदाचा क्षण नेहमीच चाहत्यांसह शेअर करतात. अशातच आता मालिकाविश्वातील एका अभिनेत्याने चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता लग्नानंतर दोन वर्षांनी बाबा होणार असल्याची ही बातमी आहे. मालिकाविश्वातील लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचे नाव आहे आकाश नलावडे.

‘साधी माणसं’ या मालिकेमुळे आकाशला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आज ८ सप्टेंबर रोजी आकाश नलावडेचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाचे औचित्य साधत आकाशने बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली. आकाशची पत्नी रुचिकाने, बॅकग्राऊंडला प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. रुचिकाने यावर, “आमच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. आम्ही प्रेग्नंट आहोत. देवा तुझे खूप खूप आभार”, असं कॅप्शन देत ही आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर लगेचच पतीचे निधन, आयुष्य संपवण्याचा विचार आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा कठीण काळ, नशीब चमकलं जेव्हा…

View this post on Instagram

A post shared by Ruchika Dhuri (@ruchika_dhuri)

रुचिका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “ही आनंदाची बातमी अनेक दिवस आम्ही गुपित ठेवली होती”. यापुढे तिने “Baby Arriving”, “लव्ह”, “आमच्या घरचा नवीन सदस्य” असे हॅशटॅग्ज दिले आहेत. ya पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवानी बावकर, पूजा बिरारी, साक्षी गांधी, कुंजिका काळवींट, अशोक फळदेसाई, दिगंबर नाईक यांनी कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत आकाश व रुचिका यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “आनंद कमी आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील वातावरणाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “इतकं रोबोटिक…”

आकाश नलावडेने २०२२ मध्ये रुचिका धुरीसह साखरपुडा केला होता. यानंतर १८ मार्च २०२३ रोजी आकाश आणि रुचिका यांनी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता आकाश व रुचिका दोघेही त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत.

Tags: akash nalawadegoodnewsmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
abhijeet chavan fake news

प्रिया मराठेसह फोटो, मृत्यूची खोटी बातमी आणि…; दिशाभूल करताच मराठी अभिनेत्याचा संताप, विशाखा सुभेदारचीही कमेंट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.