शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रिया मराठेसह फोटो, मृत्यूची खोटी बातमी आणि…; दिशाभूल करताच मराठी अभिनेत्याचा संताप, विशाखा सुभेदारचीही कमेंट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 9, 2025 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
abhijeet chavan fake news

प्रिया मराठेसह फोटो, मृत्यूची खोटी बातमी आणि...; दिशाभूल करताच मराठी अभिनेत्याचा संताप, विशाखा सुभेदारचीही कमेंट

abhijeet chavan fake news : आजकाल सोशल मीडिया इतकं प्रबळ झालं आहे की, एखादी बातमी वाऱ्यासारखी काही क्षणात संपूर्ण जगभरात पसरते. बातमी चांगली असो वा वाईट ती पसरायला काही क्षणाचाही विलंब लागत नाही. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून बरेचदा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. बरेचदा कलाकारांच्या वा दिग्गज कलाकार मंडळींच्या निधनाच्या खोट्या बातम्याही पसरतात. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची बातमी समोर आली. हे पाहून त्यांना स्वतःलाही धक्का बसला. शेवटी त्यांनी स्वतःच एका माध्यमाशी संपर्क साधत ही बातमी खोटी असल्याचं आणि ते ठणठणीत असल्याचं म्हटलं. यानंतर आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा साऱ्यांना धक्का बसला. ही बातमी खोटी आहे की काय असं वाटलं मात्र प्रिया मराठेचे खरोखरच कर्करोगाने निधन झाल्याचे समोर आले. प्रियाच्या जाण्याने संबंध सिनेविश्वाला खूप मोठा धक्का बसला. प्रिया पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू असे फसवणूक करणारे थंबनेल पाहून या मराठी अभिनेत्याने आवाज उठविला आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत चव्हाण. अभिजीत चव्हाणला सिनेविश्वात बाबा असंही म्हणतात.

आणखी वाचा – लग्नानंतर लगेचच पतीचे निधन, आयुष्य संपवण्याचा विचार आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा कठीण काळ, नशीब चमकलं जेव्हा…

मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून अभिजीत नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. मराठीसह हिंदीतही अभिजीतने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मात्र अभिजीत स्वतःच्या मृत्यूच्या बातमीने संतापला आहे. थेट फेसबुक पोस्ट शेअर करत ‘आता काय करायचं’ असं म्हणत अभिजीतने पोस्ट लिहिली आहे. “मराठी सिनेविश्वातील दोन कलाकार गमावले”, असं म्हणत प्रिया मराठे आणि अभिजीत चव्हाणचे फोटो थंबनेलला लावले. आतील क्लिकवर अभिनेते आशिष वारंग यांची बातमी देत चुकीचा फोटो लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न या युट्युब चॅनेलमार्फत करण्यात आला.

आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज

“माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली. अजून काय पाहिजे. आता काय करायचं यांचं?”, असा सवाल अभिजीतने त्याच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. याशिवाय त्याच्या पोस्टवर असंख्य मराठी कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. विशाखा सुभेदारने यावर कमेंट करत, “कारवाई करा आणि तुझं आयुष्य वाढलं बाबा”, असं म्हटलं आहे.

Tags: Abhijeet Chavanabhijeet chavan fake newsmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
Next Post
Shilpa Shirodkar loneliness

"एकटेपण मला खात होतं", ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.