प्रसिद्धी म्हणलं की सगळ्याचं गोष्टींना सामोरं जावं लागत. राजकारणी, खेळाडू किंवा कलाकार सगळ्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि सोशल आयुष्य काहीवेळ यात असणार वेगळेपण विसरावं लागत. असच झालाय दोन विनोदी कलाकारांसोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या या हास्य निर्मती करनाऱ्या आघाडीच्या कार्यक्रमांमधील अभिनेत्री स्नेहल शिदंम आणि अभिनेता निखिल बने यांचा एक फोटो सोशल मिडिया वर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.(nikhil bane and snehal shidam)

महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील अभिनेत्री वनिता खरात हिचं नुकतंच लग्न पार पडलं ज्या लग्नाला महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील टीम सह अन्य कलाकारांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. वनिताच्या आयुष्यातील हा आनंदी क्षण साजरा करण्यासाठी तिची मैत्रीण आणि चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री स्नेहल शिदंम देखील हजर होती. या लग्नातीळ अनेक कलाकारांचे फोटो तुफान व्हायरल झाले. त्यामध्ये स्नेहल ने पोस्ट केलेल्या एका फोटो आणि त्या फोटोच्या कॅप्शन ने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(nikhil bane and snehal shidam)
स्नेहल ने तिच्या अकाउंट वरून एक फोटो शेअर केलाय. या फोटोत ती अभिनेता निखिल बने याच्यासोबत पोज देताना दिसतेय. या फोटोला तिनं ‘पिरतीच्या फडात गं धरला हात असा काळीज येंधलं आरल …..’ अस caption दिलं. तिने हॅशटॅग मध्ये #wearejustfriend असं देखील लिहिलं आहे तरीही तिच्या पोस्ट वर चाहत्यांनी शुभेच्छांची कमेंट केली आहे. तर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सुद्दा ‘मला तू काहीच सांगितलं नाहीयेस. स्नेहल माझ्या मेकअप रुममध्ये लगेच ये..मला अपडेट हवेत… अशी लक्षवेधी कमेंट करत चाहत्यांना संभ्रमात पाडलं आहे.(nikhil bane and snehal shidam)
तर ‘महाराष्टाची हास्य जत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ यातील या जोडीमध्ये युती होणार का? स्नेहल आणि निखिल एकत्र येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.