Jahnavi Killekar Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये टास्क क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या जान्हवी किल्लेकरने अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’ मुळे जान्हवीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम खेळ खेळत जान्हवीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सुरुवातीला जान्हवी तिच्या उद्धट, उर्मटपणामुळे बरेचदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली. मात्र, कालांतराने या टास्क क्वीनने उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’नंतरही जान्हवी बरीच चर्चेत राहिलेली दिसली.
आता ‘बिग बॉस’नंतर अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळतेय. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यांत अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने स्वतःलाच एक भेटवस्तू दिली असल्याचा एक सुंदर असा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या भेटवस्तूचा ‘बिग बॉस’च्या घराशी संबंध आहे, त्यामुळे हा व्हिडीओ विशेष आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला जान्हवीने दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. याच व्हिडीओत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तिने स्वतःला एक गिफ्ट दिल्याचे म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणते, “आजचा व्हिडीओ तयार करण्यामागे एक खास कारण आहे. पाडव्याच्या निमित्तानं मी स्वतःला एक गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट तसं छोटंच आहे; पण ते माझ्यासाठी खूप खास आहे”, असं म्हणत ते गिफ्ट उघडून दाखवते. यावेळी अभिनेत्रीने गिफ्टमध्ये स्वतःला एक सोन्याचं ब्रेसलेट दिलं असून त्यावर ‘बिग बॉस’चं चिन्हही पाहायला मिळतंय.
जान्हवी या व्हिडीओमध्ये ब्रेसलेट दाखवत म्हणतेय की, “या ब्रेसलेटमध्ये इव्हिल आय आहे. मात्र, माझ्यासाठी हे ‘बिग बॉस’चं चिन्ह आहे. ‘बिग बॉस’ माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण, आज मी जी काही आहे, ती ‘बिग बॉस’मुळे आहे. मी आता बिग बॉसचं हे ब्रेसलेट हातात घालणार आहे. हे ब्रेसलेट तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करुन नक्की सांगा. मी लवकरच ‘बिग बॉस’च हे ब्रेसलेट घालून, ते फोटो पोस्ट करणार आहे”.