‘अनुपमा’ ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाला होता. गुरुवारी, १४ नोव्हेंबर रोजी ‘अनुपमा’च्या सेटवर असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावर आता ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने कारवाई करत मृत पावलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. (Anupama Serial Set Lightman Death Compensation)
या मागणीला यश मिळाले असून मालिकेच्या निर्मात्यांनी मृताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या नुकसान भरपाईला ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने याला दुजोरा दिला आहे. ‘ETimes’च्या वृत्तानुसार, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE)चे अध्यक्ष बी. एन. तिवारी म्हणाले की, “आम्हाला राजन शाही यांच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे की, अनिल मंडलचे वडील अविवाहित असल्यामुळे त्यांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल”.
बी.एन. तिवारी यांनी सांगितले की, अनिल कुमार मंडल सेटवर नवीन होते आणि त्यामुळे त्यांचा इतर लोकांशी फारसा संवाद किंवा परिचय नव्हता. बी. एन. तिवारींनी याबद्दल असं म्हटलं होतं की, “तो सेटवर काम करत होता आणि शॉर्ट सर्किटमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळेल याची आम्ही खात्री करु”. मात्र ‘अनुपमा’चे निर्माते राजन शाही यांनी अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
दरम्यान, टीआरपीच्या शर्यतीत असणारी अनुपमा मालिका कायम चर्चेत असते. आता पुन्हा हा मालिका चर्चेत आली आहे. पण, यामागचं कारण काही वेगळं आहे. रुपाली गांगुलीच्या ‘अनुपमा’ मालिकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघातात कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्ऱ्यांपर्यंत पोहोचलं होतं.