Krushna Abhishek Wife Health Update : टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहचा लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं. तिच्या नाकाला जबरदस्त दुखापत झाली असल्याचं समोर आलं. अभिनेत्रीच्या समोर आलेल्या हेल्थ अपडेटवेळी तिच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं. मात्र, आता तब्येतीबाबतचा धोका टळला आहे. कश्मीरा शाहने इन्स्टाग्रामवर तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने स्वतःचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली होती. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या रुमालाचा एक फोटो शेअर केला होता. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या नाकावर जखम दिसत आहे.
तब्येतीबाबत कश्मिराने बनवलेल्या व्हिडीओमध्ये तिने साऱ्यांचे आभार मानले आहेत. १८ नोव्हेंबर रोजी कश्मीराचा लॉस एंजेलिस येथे अपघात झाला होता. स्वतःचा व्हिडीओ शेअर करत तिने व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “आता नाकावर एक लहान पट्टी आहे, मोठी पट्टी काढली आहे. पण आता मी बरी आहे. सर्वांचे आभार. रस्ता ओलांडत आहे, नाहीतर इथेच पडायचे. प्रार्थना केल्यात त्यासाठी सर्वांचे आभार, लव्ह यू”.
काही दिवसांपूर्वी कश्मिरा अमेरिकेतील एका मॉलमध्ये काचेवर आदळल्याने जखमी झाली होती. कश्मिराने याआधी रक्ताने भिजलेल्या कपड्यांचा फोटो शेअर केला होता, जो पाहून चाहते घाबरले होते. थोडक्यात ती बचावली अन्यथा तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असत्या. सुदैवाची गोष्ट म्हणजे फक्त तिच्या नाकाला दुखापत झाली होती, ज्यातून ती आता बरी होत आहे. ती लवकरच भारतात परतणार असल्याचेही अभिनेत्रीने सांगितले.
अभिनेत्री आरती सिंहनेही वहिनी कश्मीराच्या अपघाताबद्दल माहिती दिली होती. “तिची पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही सगळे काळजीत पडलो. मी कश्मीराशी बोललेय. ती आता बरी होत आहे. तिच्या नाकाला जखम झाली आहे. एका मॉलमध्ये ती काचेला धडकली, काच फुटली आणि तिच्या नाकाला लागलं. खूप रक्तस्त्राव झाला, पण आता ती सुखरूप आहे”, असं ती म्हणाली होती.