बरीच अशी कलाकार मंडळी आहेत, ज्यांचं कुटुंब हे सिनेमाविश्वात कार्यरत आहेत. मात्र काहींच्या बाबतीत तस नाही आहे. काही कलाकारांची भावंडं म्हणा, वा पालक म्हणा हे वेगवेगळ्या क्षेत्रात ही कार्यरत असलेले पाहायला मिळतात. बरं क्षेत्र वेगळे असले तरी एकमेकांना एकमेकांच्या क्षेत्राचा आदर आहे, आनंद आहे. असाच आदर आनंद वाटणाऱ्यांचा यादीत स्पृहा जोशी हे नाव आवर्जून घेतलं जातं. (Spruha Joshi Kshipra Joshi)
अभिनेत्री स्पृहा जोशी हिला तिच्या धाकटी बहिणीच्या कामाचा आदर आहे, शिवाय तिच्या विषयी तिच्या मनात विशेष प्रेम देखील आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण कित्येकदा स्पृहा तिची धाकटी बहीण क्षिप्रा जोशी बद्दल बरेच बोलताना दिसते. त्यांचं बॉण्डिंगही खूप घट्ट आहे, हे त्यांनी शेअर केलेल्या फोटोसवरून कळून येतं.
पाहा स्पृहाच्या बहिणीबद्दल हे माहित आहे का? (Spruha Joshi Kshipra Joshi)
स्पृहाची धाकटी बहीण क्षिप्रा ही भारतातील प्रसिद्ध खेळाडूंच्या यादीत येते. नुकतीच स्पृहाने अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिले के करीब’ कार्यक्रमात याबाबत भाष्य केलं, तिला विचारण्यात आलं की, “तुला एक बहीण आहे ना? ती काय करते?” यावर स्पृहा जोशी म्हणाली आहे की, “हो. मला धाकटी बहीण आहे. तिच एक वेगळंच करिअर आहे. ती खेळाडू आहे. दिल्लीत कॉमनवेल्थ गेम (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) झाली तेव्हा ती इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन होती.”
“जवळपास तिनं १५-२० यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर तिच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड आहे. तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये क्षिप्रा जोशी हे खूप नावाजलेलं नाव आहे. ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वात तरुण परीक्षांपैकी एक आहे. ती जागतिक पातळीवर परीक्षण करायला जाते. तसेच तिच्याकडे शिकत असलेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे.”
स्पृहाने दिलेल्या या मुलाखतीत ती तिच्या बहिणीबद्दलच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबियांबद्दल भरभरून बोलली आहे. तिच्या आई बाबांबाबद्दल ही तिने भाष्य केलं आहे. शिवाय तिने तिच्या सासू सासऱ्यांबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.