‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेने अचानक सात वर्षांचा लीप घेतल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आलेल्या या वळणाने साऱ्यांची उत्सुकुता आणखी वाढून राहिली आहे. अप्पी अर्जुन अखेर सात वर्षांनी एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर अर्जुन व अमोलचीही भेट झालेली दिसली. दोघांच्या वडील-मुलाचं अनेक वर्षांपासून दुरावलेलं नातं फुलताना पाहायला मिळत आहे. (Rohit Parshuram Video)
मालिकेत अर्जुन ही भूमिका अभिनेता रोहित परशुराम साकारत आहे. रोहितला अर्जुन या भूमिकेमुळे विशेष पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. तर अप्पी ही भूमिका अभिनेत्री शिवानी नाईक साकारत आहे. तर बालकलाकार साईराज केंद्रे मालिकेत अमोलच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अर्जुन म्हणजेच रोहित बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अशातच रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शूटिंगच्या ब्रेकमध्ये धमाल करताना दिसत आहे. यांत असं पाहायला मिळत आहे की, रोहित सेटवर कॉफी बनवताना दिसत आहे. रोहितने चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत सर्वांसाठी कॉफी बनवली आहे. “या वयात सगळ्यांचं सगळं ऐकायचं नसतं. आणि पावसाळ्यात कॉफी पिऊ नको असं सांगणाऱ्या डाएटिशनच अजिबात नाही”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचं किचनही पाहायला मिळत आहे. घराच्या पाठीमागे आणि निसर्गाच्या सान्निध्यात एक लहान असं छान किचन असल्याचं पाहायला मिळालं. रोहित हा अभिनेता असण्याबरोबरच बॉडी बिल्डरही आहे. त्यामुळे तो त्याच्या अनेक स्टायलिश फोटोसह बॉडी बिल्डिंगचे फोटोही शेअर करत असतो.