सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, कमाई नसतानाही कसं आयुष्य जगतात रेखा?, इतके महागडे कपडे, सगळा खर्च नक्की कसा करतात?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rekha Income

१० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, कमाई नसतानाही कसं आयुष्य जगतात रेखा?, इतके महागडे कपडे, सगळा खर्च नक्की कसा करतात?

बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखा यांना ओळखीची गरज नाही. बालपणात अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या रेखा यांना अगदी लहान वयातच अभिनयाच्या जगात प्रवेश करावा लागला. त्यांना कधीच नायिका बनायचे नव्हते, पण परिस्थिती आणि मजबुरीने त्यांना अभिनयात यायला भाग पाडले. रेखा यांनी चित्रपटांमध्ये येत लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केले. आजही रेखा यांचे लाखो चाहते आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्या आजच्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकतात हे ही तितकेच खरे. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे. पण त्यांना रेखा म्हणूनच ओळखले जाते. एका वर्षाच्या असताना त्यांनी ‘इंटी गुट्टू’ या तेलगू चित्रपटात काम केले. रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि राष्ट्रीय पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार जिंकले. रेखा गेल्या १० वर्षांपासून सिनेजगतापासून दूर आहेत. असं असलं तरी अनेक कार्यक्रमांमध्ये त्या स्पॉट होताना दिसतात. (Rekha Income)

जर ही अभिनेत्री इतकी वर्षे अभिनयापासून दूर आहे, तर त्यांचे उत्पन्न कुठून येते?, त्या त्यांचा घरखर्च कसा भागवतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रेखा यांच्याकडे मुंबईमध्ये दक्षिण भारतात अनेक मालमत्ता आहेत. यातील काही भाग त्यांनी भाड्याने दिले आहेत. या भाड्याने महिन्याला त्या लाखो रुपये कमावतात. रेखा या मुंबईतील बँडस्टँड परिसरात राहतात. त्यांच्या घराजवळच एका बाजूला शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला आहे आणि दुसऱ्या बाजूला सलमानचा गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. रेखा यांच्या बंगल्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असून त्याचे नाव ‘बसेरा’ आहे.

आणखी वाचा – दिशा-दामिनीचं पितळ उघडं पडणार?, प्रीतमच्याही आयुष्यात नवी मुलगी आली अन्…; साखरपुडा मोडत प्रेमाची कबुली देणार का?

View this post on Instagram

A post shared by Rekha (@legendaryrekha)

रेखा या ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतात. वेळोवेळी काही टीव्ही मालिकांचे प्रमोशन व जाहिराती करातात तिथून त्यांना चांगले मानधन मिळते. रिपोर्ट्सनुसार, होर्डिंगवर त्यांचा फोटो वापरला तर रेखाला त्यासाठी १०-२० लाख रुपये मिळतात. ‘मसाला डॉट कॉम’च्या वृत्तानुसार रेखा यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे काही रक्कम मुदत ठेवी स्वरूपात आहेत. करिअरच्या शिखरावर असताना त्यांने मिळालेले पैसे वाया घालवण्याऐवजी आपली कमाई वाचवली आणि ती एफडीमध्ये गुंतवली. त्यांनी आपल्या कमाईतील बहुतांश रक्कम बँकेच्या ठेवींमध्ये गुंतवली.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही सख्ख्या भावांची गैरहजेरी?, भाऊ कुशनेच सांगितलं सत्य, म्हणाला, “उपस्थित नव्हतो असं…”

रेखा या कधीही लेटेस्ट डिझायनर कपडे घालत नाहीत किंवा कपड्यांवर पैसे खर्च करत नाहीत. खरं तर, ज्या वेगवेगळ्या सिल्कच्या साड्यांमध्ये दिसतात त्या त्यांना बहुतेक भेटवस्तू म्हणून मिळाल्या आहेत. त्यांची किंमत लाखात आहे. रेखा आपल्याबरोबर स्टाफची मोठी टीमही ठेवत नाही. त्या अनावश्यक खर्च टाळतात आणि बचत करतात. रेखा खासदार व राज्यसभेच्या सदस्य असताना त्यांना दरवर्षी ६५ लाख रुपये पगार मिळत असे. याशिवाय रेखा कोणत्याही खासगी कार्यक्रमाला किंवा समारंभाला गेल्यास त्यासाठीही त्यांना लाखो रुपये मिळतात.

Tags: bollywood actressentertainmentrekhaRekha Incomerekha property
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Huma Qureshi Dating Rumour

सोनाक्षी सिन्हानंतर हुमा कुरेशी लग्नबंधनात अडकणार?, अभिनेत्रीच्याच लग्नात बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो व्हायरल, तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.