सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हानंतर हुमा कुरेशी लग्नबंधनात अडकणार?, अभिनेत्रीच्याच लग्नात बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो व्हायरल, तुफान चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2024 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Huma Qureshi Dating Rumour

सोनाक्षी सिन्हानंतर हुमा कुरेशी लग्नबंधनात अडकणार?, अभिनेत्रीच्याच लग्नात बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो व्हायरल, तुफान चर्चा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाची धामधुम सिनेसृष्टीत पाहायला मिळाली. अगदी थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा २३ जून रोजी पार पडला. दोघांच्या नात्याला सात वर्ष पूर्ण होताच या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. नोंदणी पद्धतीने सोनाक्षी व झहीर यांचं लग्न झालं. त्यानंतर दोघांचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी उपस्थित होते. सोनाक्षी सिन्हाच्या जिवलग मैत्रिणींपैकी एक हुमा कुरेशीनेही मैत्रिणीच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. (Huma Qureshi Dating Rumour)

या पार्टीत हुमा कुरेशी तिचा बॉयफ्रेंड रचित सिंहबरोबर पोहोचली होती. या प्रसंगातील अनेक फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की, सोनाक्षीनंतर पुढची जोडी हुमा कुरेशी आणि रचित सिंह असणार आहे. हुमा व रचितच्या डेटिंगच्या बातम्या अनेक दिवसांपासून कानावर पडत होत्या. सोनाक्षीच्या लग्नाच्या या फोटोंमध्ये रचितबरोबर हुमा कुरेशीला पाहून त्यांच्या प्रेमकथेची चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही याबाबत काहीही दुजोरा दिला नसला तरी आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा – १० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, कमाई नसतानाही कसं आयुष्य जगतात रेखा?, इतके महागडे कपडे, सगळा खर्च नक्की कसा करतात?

हुमा कुरेशीला सगळेच आधीपासून ओळखतात पण रचितबद्दल फार कमी जणांना ठाऊक असेल. तो एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि महत्त्वाकांक्षी अभिनेता आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांबरोबर त्याने अभिनय प्रशिक्षक म्हणूनही काम केल्याचे बोलले जाते. रचित रवीना टंडनच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेबसीरिजमध्येही दिसला आहे. ज्यामध्ये त्याने वेदांतची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा – अमिताभ बच्चन यांच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा

रचितच्या आधी हुमाने दिग्दर्शक व पटकथा लेखक मुद्दसर अजीजला डेट केले होते. मात्र, अनेक वर्षांपूर्वी दोघे वेगळे झाले. सुमारे तीन वर्षे डेट केल्यानंतर हुमा आणि मुद्दसर यांचे ऑक्टोबर २०२२ मध्ये ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे.

Tags: entertainmentHuma Qureshihuma qureshi and rachit singhHuma Qureshi Dating Rumour
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Gautami Deshpande on plastic usage in Mumbai

"कृपया प्लास्टिकचा वापर टाळा", 'ती' भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "दुसऱ्यांना दोष देतो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.