बॉक्स ऑफिसवर ‘बार्बी’ आणि ‘ओपनहायमर’ या दोन हॉलीवूडपटांनी मागचा आठवडा गाजवल्यानंतर आता गेल्या शुक्रवारी करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमा देशभरात रिलीज झाला. आणि पहिल्याच दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. (rocky aur rani ki prem kahani box office collection)
रणवीर सिंह व आलिया भट्ट यांच्या एनर्जेटिक अभिनयाने सजलेल्या या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे आतापर्यंत केलेल्या कमाईची आकडेवारी आली असून तीन दिवसात किती कमाई केली ते जाणून घेऊया.
वाचा सिनेमाने केली तीन दिवसांत इतकी कमाई (rocky aur rani ki prem kahani box office collection)
रणवीर-आलियाच्या या सिनेमाने शुक्रवारी पहिल्या दिवशी ११.१० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शनिवारी १६.५ कोटींचा गल्ला जमवला. रविवारी म्हणजे रिलीजच्या तिसऱ्या दिवशी १८ कोटी रुपयांची जोरदार कमाई करत तीन दिवसांत ४५ कोटींहून अधिक कमाई करत सिनेमा लवकरच ५० कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे.
यासह करण जोहरचा हा सिनेमा पठाण, आदिपुरुष, किसी का भाई किसी की जान आणि तू झुठी में मक्कर नंतर वर्षातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा बॉलीवूड सिनेमा ठरला आहे. एकीकडे ‘बार्बीहायमर’ ची क्रेझ असताना कारण जोहरच्या या सिनेमाने रिलीज करण्याचे मोठे धाडस करत या तीन दिवसात दमदार कमाई केली, हे विशेष. (rocky aur rani ki prem kahani box office collection)
हे देखील वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या दिग्गज नटांचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा करण जोहर यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमामध्ये रणवीर सिंह व आलिया भट्टसह ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन, रोनित रॉय व मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार दिसलेले आहेत. रणवीर-आलियाच्या अभिनयाबरोबरच धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या एक लिपलॉक सीनची जोरदार चर्चा रंगलेली आहे. (rocky aur rani ki prem kahani box office collection)