रितेश देशमुख आणि जेनेलिया(ritesh geneliya) देशमुख ही बॉलीवूड मधील जगप्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाते.तर संपूर्ण महाराष्ट्रचे ते लाडके दादा वाहिनी आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा “वेड” या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडलेली दिसते. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला. जेनेलियाचा वेड हा पहिला मराठी सिनेमा असून यात रितेश आणि जेनेलियाची केमेस्ट्री चांगलीच जुळून आलेली पाहायला मिळतेय. या आधी जेनेलिया रितेश सोबत माउली या मराठी सिनेमा मध्ये एका गाण्यावर थिरकली आहे.
आज रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. जेनेलियाने त्या दोघांचा एक विनोदी व्हिडियो शेअर केला असून यात ती “मी तुझ्यासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार असल्याचं म्हणत आहे त्यावर रितेश म्हणतो तू तर माझ्यासासोबतच भांडत असतेस तर ती म्हणते माझं जग तर तूच आहेस. त्या रीलच्या शेवटी त्या दोघांच्या हावभाव पाहण्यासारखे आहेत.(ritesh geneliya)

रितेश नेसुद्धा त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यावर माय हॅपिनेस, माय सेफ प्लेस, माय लाईफ हैप्पी ११ एनिवर्सरी बायको असं म्हंटल आहे. त्यांच्या या व्हिडियो खाली अनेक सेलिब्रिटींनी व चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एनिवर्सरी साजरी करायला ते दोघे आज ट्रेक ला गेले आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते एकमेकांसोबत तसेच मुलांसोबत फनी व्हिडियो शेअर करत असतात. चाहत्यांना त्यांचे व्हिडियो बघायला देखील फार आवडतात.(ritesh geneliya)
रील चित्रपटातील वेड या गाण्याने प्रेक्षकांना सोबतच अनेक कलाकारांना सुद्धा भुरळ पाडली आहे. कित्येक कलाकारांनी या गाण्यावर रील बनवत प्रेक्षकांची तुफान वाहवा मिळवली आहे. कित्येक प्रेक्षक सुद्दा या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. रितेशचा हा दिगदर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांकडून रितेशच्या दिगदर्शनाचं कौतुक होत आहे.(ritesh geneliya)
===
हे देखील वाचा – ‘ख्वाब कहूं या गुलाब कहूं…’ रुपालीच्या पोस्ट वर शायराना अंदाजात कमेंट
===