‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पूजाने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो शेअर करताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तेव्हापासून अभिनेत्री फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार पूजाने नुकताच तिचा साखरपुडा उरकला आहे.
साखरपुडा सोहळ्यासाठी अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. पूजा आणि सिद्धेश दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते.
त्याचबरोबर यानंतरही पूजा व सिद्धेशने व्हाईट रंगांच्या भरजरी पेहरावात माध्यमांसमोर येत अंगठी दाखवत त्यांचा साखरपुडा सोहळा झाला असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
पूजा सावंतने जोडीदाराबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. काही वृत्तांनुसार, पूजा सावंतचा होणारा पती ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक असल्याचे म्हटले जात आहे.
पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून अभिनेत्री केव्हा लग्न करणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे.
पूजा व सिद्धेशच्या साखरपुडा सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, गश्मीर महाजनी, फुलवा खामकर, वैभव तत्ववादी यांसह अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान पूजा-सिद्धेशच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून पूजाला साखरपुड्यानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.