अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकवर्ग या दोघांना दादा वहिनी म्हणून ओळखतात. बॉलिवूडसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनायसह ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असतात. (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh)
रितेश व जिनिलिया यांच्यासह त्यांची दोन्ही मुलंही नेहमीच चर्चेत असतात. रितेश-जिनिलिया यांना रियाल व राहील अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावरही ही त्यांची ही दोन्ही मुलं नेहमीच चर्चेत असतात. विशेषतः रितेश व जिनिलियाच्या दोन्ही मुलांचं विशेष कौतुक केलं जात ते त्यांच्यावरील संस्कारामुळे. मीडियावसमोर आल्यावर त्यांची ही दोन्ही मुलं कायम हात जोडून नमस्कार करताना दिसतात. त्यामुळे या मुलांचेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचे ही कौतुक करण्यात येते.
नुकताच जिनिलिया व रितेश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र फोटो पोज देताना दिसत आहेत. दोन्ही मुलांबरोबर पापराझींना फोटो पोज देऊन झाल्यानंतर त्यांचा लहान मुलगा राहिल पायरी उतरायला गेला जातो तेव्हा तो अचानक पाय अडखळून खाली पडताना दिसतो. मुलगा खाली पडतोय हे पाहून रितेश व जिनिलिया दोघंही सुरुवातीला हसतात. त्यानंतर लगेचच जिनिलिया पुढे येत राहीलला जवळ घेत मिठी मारताना दिसते. त्यामुळे जिनिलियाच्या या सहजतेच्या कृतीच नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – वयाच्या ७२व्या वर्षी ब्रिजेश त्रिपाठी यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव
नुकताच रितेशचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. नवऱ्यासाठीची ही जिनिलियाची पोस्ट सर्वत्र चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळाली. तसेच चाहत्यांनी व कलाकार मंडळींनीही रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या.