ज्येष्ठ अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचं वयाच्या ७२व्या वर्षी निधन झालं आहे. ‘ओम’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ब्रिजेश त्रिपाठी आज आपल्यात नाहीत. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Brijesh Tripathi Passes Away)
भोजपुरी सिनेसृष्टीत १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले ब्रिजेश त्रिपाठी यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ब्रिजेश त्रिपाठी गेल्या ४६ वर्षांपासून अभिनयाच्या जगतात सक्रिय होते. दिग्दर्शक सुजित सिंगच्या ‘आंखे’ या चित्रपटाचे ते शूटिंग करत होते.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेला नवं वळण, किल्लेदारांचं रहस्य उलगडणार? सायलीसमोर अपघाताचा फ्लॅशबॅक
रुपेरी पडद्यावर त्यांनी मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव, पवन सिंह व खेसारी लाल यादव यांसारख्या अनेक बड्या कलाकारांसह काम केलेलं आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांनी सलमान खानच्या ‘नो एंट्री’, ‘मोहरा’ या हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
‘ओम’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ब्रिजेश त्रिपाठी यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मांझी यांनी केले होते. अभिनेत्याच्या निधनामुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे.