शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जिनिलिया देशमुखचा लेक बघता बघता पडला अन्…; अभिनेत्रीने त्याक्षणी केलेल्या कृतीने वेधलं लक्ष, नेमकं काय घडलं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 18, 2023 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh

Video : जिनिलिया देशमुखचा लेक बघता बघता पडला अन्...; अभिनेत्रीने त्याक्षणी केलेल्या कृतीने वेधलं लक्ष, नेमकं काय घडलं?

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकवर्ग या दोघांना दादा वहिनी म्हणून ओळखतात. बॉलिवूडसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनायसह ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असतात. (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh)

रितेश व जिनिलिया यांच्यासह त्यांची दोन्ही मुलंही नेहमीच चर्चेत असतात. रितेश-जिनिलिया यांना रियाल व राहील अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावरही ही त्यांची ही दोन्ही मुलं नेहमीच चर्चेत असतात. विशेषतः रितेश व जिनिलियाच्या दोन्ही मुलांचं विशेष कौतुक केलं जात ते त्यांच्यावरील संस्कारामुळे. मीडियावसमोर आल्यावर त्यांची ही दोन्ही मुलं कायम हात जोडून नमस्कार करताना दिसतात. त्यामुळे या मुलांचेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचे ही कौतुक करण्यात येते.

आणखी वाचा – “इंडस्ट्रीत तुझा कोणी शत्रू आहे का?”, करण जोहरच्या प्रश्नावर अजय देवगणचा खुलासा, म्हणाला, “एकेकाळी…”

नुकताच जिनिलिया व रितेश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र फोटो पोज देताना दिसत आहेत. दोन्ही मुलांबरोबर पापराझींना फोटो पोज देऊन झाल्यानंतर त्यांचा लहान मुलगा राहिल पायरी उतरायला गेला जातो तेव्हा तो अचानक पाय अडखळून खाली पडताना दिसतो. मुलगा खाली पडतोय हे पाहून रितेश व जिनिलिया दोघंही सुरुवातीला हसतात. त्यानंतर लगेचच जिनिलिया पुढे येत राहीलला जवळ घेत मिठी मारताना दिसते. त्यामुळे जिनिलियाच्या या सहजतेच्या कृतीच नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

आणखी वाचा – वयाच्या ७२व्या वर्षी ब्रिजेश त्रिपाठी यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव

नुकताच रितेशचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. नवऱ्यासाठीची ही जिनिलियाची पोस्ट सर्वत्र चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळाली. तसेच चाहत्यांनी व कलाकार मंडळींनीही रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या.

Tags: genelia d souzagenelia deshmukhriteish deshmukhriteish deshmukh childrenriteish deshmukh family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व ऐश्वर्या शर्मामध्ये जोरदार भांडण, एकमेकींना नको नको ते बोलल्या अन्…; Inside Video समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.