बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखसह त्याच्या मुलांनीही केली गुढीपाडव्याची तयारी, देशमुखांची सून म्हणते, “पहाटे आम्ही…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 9, 2024 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Riteish and Genelia Deshmukh shared video of celebrating Gudi Padwa with their sons

Video : याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखसह त्याच्या मुलांनीही केली गुढीपाडव्याची तयारी, देशमुखांची सून म्हणते, "पहाटे आम्ही..."

आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा या सणाची आपण सर्वच जणं अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. अगदी उत्साहात कुटुंबाबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तसंच प्रियजनांबरोबर गुढीपाडवा साजरा केला जातो. सामान्य कुटुंबियांबरोबरच मनोरंजन कलाविश्वातील कलाकार मंडळीदेखील आजचा हा खास सण साजरा करत आहे.

अशातच बॉलिवूड व मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी रितेश व जिनिलीयानेदेखील गुढीपाडव्यानिमित्त जंगी तयारी करत आहेत. जिनिलीया देशमुखने गुढी रितेशसह आपल्या दोन मुलांचा गुढी सजवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीयाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख आपल्या लाडक्या मुलांबरोबर रिआन व राहिलसह गुढी सजवताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – हिरवी साडी तर नवऱ्याने नेसलं गुलाबी रंगाचं धोतर; लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी मुग्धा-प्रथमेशची जय्यत तयारी, फोटो व्हायरल

नवऱ्याचा व मुलांचाहा खास व्हिडीओ शेअर करत जिनिलीयाने त्यावर “पहाटे आमची गुढी तयार होतं आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.” असं लिहिलं आहे. एवढंच नाहीतर जिनिलीयाने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत रितेशबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये रितेश कपड्यांच्या घड्या घालत आपण घरात काम करण्यासाठी एक नोकर ठेवूया का? असं विचारतो. यावर जिनिलीया “तू है तो मुझे फिर और क्या चाहिये” असं म्हणत त्याच्याकडे घडी घालण्यासाठी आणखी कपडे देते.   

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

आणखी वाचा – ठरलेलं लग्न मोडलं, थेट घरी जाऊन लग्नाची मागणी घातली अन्…; अमीर हडकर यांची फिल्मीस्टाइल लव्हस्टोरी, म्हणाले, “तिने आधी नाही म्हटलं तेव्हा…”

दरम्यान, रितेश-जिनिलीया यांनी कायमच प्रत्येक सण साजरे करतानाचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आजच्या या मोबाइलच्या व तंत्रज्ञानाच्याया जगात मुलांना आपली संस्कृती, रुढी व परंपरा शिकवण्यामुळे त्यांचे कायमच कौतुक केले जाते. ते दोघं नेहमीच आपली संस्कृती जपत, मुलांवरही संस्कृतीचा वारसा जपण्याचे संस्कार करत असतात. अशातच त्यांचा हा व्हिडीओही चर्चेत आहे.    

Tags: genelia deshmukhmarathi entertainment newsritesh deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
MC Stan instagram post

एमसी स्टॅन रॅप करणं सोडणार; स्वतःनेच पोस्ट शेअर करत दिली माहिती, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर, पण नक्की घडलं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.