‘बिग बॉस १६’ कहा विजेता राहिलेला एमसी स्टॅन सध्या अधिक चर्चेत आहे. तो एक प्रसिद्ध रॅपर असून त्याचे सोशल मीडियावर खूप फॅन आहेत. पण आता त्याने केलेल्या एका घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एमसी स्टॅनने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सगळेजण हैराण झाले असून सर्वांचेच त्याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान त्याने बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर तो लाईव्ह शो व कॉन्सर्टमध्ये अधिक व्यस्त झाला. अशातच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी करुन डिलिट केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. (MC Stan instagram post)
‘बिग बॉस १६’च्या माध्यमातून एमसी स्टॅन हा घराघरात पोहोचला. नुकतेच त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रॅपिंग सोडण्याची घोषणा केली होती. पण काही वेळानंतर ही स्टोरी डिलिट केली. त्याच्या या घोषणेने इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. पण त्याने अशी पोस्ट का केली असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले होते की, “मी रॅप करणे सोडणार आहे”, तसेच हे लिहून पुढे रेड हार्ट इमोजीदेखील लावली होती.
त्याच्या या पोस्ट सर्वांनीच आपापली मतं मांडण्यास सुरुवात केली. काही म्हणाले की डोंगरीची भाषा बोलणाऱ्या एमसी स्टॅनच्या मते सोडणार म्हणजे एखादा रॅप रिलीज करणार असेल असेही असू शकते. रॅपच्या दुनियेमध्ये गाणे लॉच करण्याला ‘ड्रॉप करणे’ असे म्हणतात.
एमसी स्टॅन हा मूळचा पुण्याचा असून १२ व्या वर्षामध्ये त्याने कव्वाली गाण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर २०१८ साली त्याने रॅप करण्यास सुरवात केली. ‘वाटा’ हे त्याचे पहिले गाणे होते. २०२० साली त्याचा ‘तडीपार’ हा पहिला अल्बम रिलीज झाला. त्यानंतर त्याने ‘होश मे आ’,’एक दिन प्यार’ असे रॅप लिहिले आणि गायले.
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर मात्र त्याने ‘खतरो के खिलाडी’ व ‘झलक दिख ला जा’ या रिॲलिटी शो पासून लांब राहिला. नुकतेच सलमान खानने त्याची भाची अलिजेहचा चित्रपटामध्ये त्याला रॅप करण्याची संधी दिली होती.