आलिया भट्ट व रणबीर कपूरने मुलगी राहा हिला २०२२ साली जन्म दिला. सुरुवातीला वर्षभर त्यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा मीडियासमोर आणलाच नाही. राहा ही कपूर कुटुंबाची लाडकी लेक आहे. आई-वडील व आजी-आजोबांची लाडकी राहा सोशल मीडियावर सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. अलीकडेच एका चाहत्याने एक संपादित फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये राहा तिचे दिवंगत आजोबा ऋषी कपूर यांच्यासह दिसत आहे. या हृदयस्पर्शी फोटोने राहाच्या कुटुंबात अनेकजण भावुक झालेले पाहायला मिळाले. हा फोटो पाहून नीतू कपूर व सोनी राजदान यांना खूप आनंद झाला. (Raha Kapoor Photo)
अलीकडेच, सोनी राजदान यांनी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये दिवंगत ऋषी कपूर एका छोट्या मुलीला जवळ घेतलेलं पाहायला मिळत आहे. या फोटोवर त्यांची नात राहा कपूरचा चेहरा डिजिटली एडिट करण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. सोनी राजदान यांनी हा फोटो शेअर करत असे म्हटले की, “हे किती छान एडिटिंग आहे. हा फोटो पाहून आमचं हृदय आनंदाने भरुन आलं आहे. धन्यवाद” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सोनी राजदान यांनी त्याच्या स्टोरीमध्ये त्यांची मुलगी आलिया भट्ट व रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनाही टॅग केले आहे. सोनी राजदानची स्टोरी पुन्हा रिपोस्ट करत, ऋषी कपूर यांच्या पत्नी, नीतू कपूर यांनी देखील हार्ट इमोजी शेअर करत ‘अतिशय गोड’ असं म्हणत केलेल्या एडिटिंगचे कौतुक केले आहे.
‘कॉफी विथ करण’ या आवडत्या टॉक शोच्या सीझन ८च्या एका भागात, नीतू कपूरने ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानसह हजेरी लावली होती. यावेळी बोलताना तिने आपली नात राहा हिच्याशी संबंधित अनेक गोष्टी सर्वांना सांगितल्या. आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची मुलगी राहा हिचे आनंदाने स्वागत केले. त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा बराच काळ लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०२३च्या ख्रिसमसला दोघांनी राहाच्या चेहऱ्याची पहिली झलक दाखविली.