सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुंबईची मुलगी रमशा फारुकीने पटकावलं ‘जाऊ बाई गावात’चं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 12, 2024 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jau Bai Gavat Finale

मुंबईची मुलगी रमशा फारुकीने पटकावलं 'जाऊ बाई गावात'चं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा रिऍलिटी शो विशेष चर्चेत राहिला. या रिऍलिटी शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता हार्दिक जोशी याने उत्तमरित्या सांभाळली. काल या शोचा फिनाले अगदी दणक्यात पार पडला. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गावाकडच्या वातावरणात राहण्याचे चॅलेंज देण्यात आले होते. शहरात अत्यंत सुखद जीवन जगणाऱ्या काही तरुणींना काही दिवस एका खेडे गावात राहून तेथील कामे एका टास्क प्रमाणे करावे लागली. गावाकडची कधीही न केलेली कामे करणे हे या शहरातल्या तरुणींसाठी हे एक मोठे आव्हानच होते. (Jau Bai Gavat Finale)

११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन व तीव्र संघर्षांनी भरलेल्या ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘रमशा फारुकी, ‘रसिक ढोबळे, ‘संस्कृती साळुंके’, ‘अंकिता मेस्त्री’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या ह्या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी, महेश मांजरेकर ही कलाकार मंडळी खास पाहुणे लाभले होते.

आणखी वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या नव्वदीतल्या फोटोने वेधलं लक्ष, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “आता खूप…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

विजेतेपदावर नाव कोरलेल्या रमशाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, ” Oh My God ! तो क्षण जेव्हा सरानी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटत की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती.पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है”. खरच बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा.

आणखी वाचा – दुसऱ्या पतीपासूनही वेगळी होणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री?, लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच नात्यात दुरावा आला अन्…

पुढे ती म्हणाली, “मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं ‘जाऊ बाई गावात’ या शोला १०० % दिले आहेत तसच पुढे ही दयायच आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकत. ‘जाऊ बाई गावात’ आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानल आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”

Tags: entertainmentjau bai gavatjau bai gavat finalejau bai gavat riality showzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Next Post
Mithun Chakraborty Health Update

मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधील पहिला व्हिडीओ आला समोर, डॉक्टरांशी बोलताना दिसले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.