Reshma Shinde Kelvan : मालिकाविश्वात सध्या लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतीच अभिषेक गांवकर व सोनाली गुरव ही जोडी लग्नबंधनात अडकली. तर शाका लाका बूम बूम फेम किंशुक वैद्यचेही लग्न झाले. यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री आणि मालिका विश्वाचा लोकप्रिय चेहरा लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं. थेट केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. ही अभिनेत्री म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे. सध्या रेश्मा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.
रेश्मा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने मिळून रेश्माच अगदी थाटामाटात केळवण साजरं केलं. यावेळी मालिकेतील सर्वच कलाकार उपस्थित होते. तिच्या रील लाईफ नवऱ्याने म्हणजेच कार्तिकने तर रेश्माला उचलून आणले, अगदी फुलांच्या पायघड्या घालून तिचं स्वागत करण्यात आलं. शिवाय तिच्या आवडीच्या पंपक्वान्नाच केळवण तिला घालण्यात आलं. खास भेटवस्तूही यावेळी अभिनेत्रीला देण्यात आला.
आणखी वाचा – Video : “मला शिक्षण घ्यायला जमलं नाही पण…”, शाळकरी मुलांसमोर सूरज चव्हाणचं भाषण, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
यानंतर आता रेश्माच्या दुसऱ्या केळवणाचा व्हिडीओ समोर आला आहे. रेश्माचं दुसरं केळवण तिच्या दोन लाडक्या मैत्रिणींनी केलं. ‘लगोरी’ मालिकेच्या अभिनेत्रींनीं एकत्र येत रेश्माच्या केळवणाचा घाट घातला. त्यांनी हे खास केळवण हॉटेलमध्ये आयोजित केलं होतं. अभिनेत्री अनुजा साठे व अभिज्ञा भावे यांनी रेश्माच हे केळवण केलं. ‘लगोरी’ मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची जिवलग मैत्री आहे. रेश्माने या व्हिडीओला ‘मेरे सपनों का राजकुमार आ रहा हैं’ असं कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा – समुद्रकिनारी सोनाली व अभिषेक गावकरचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, शाही लग्नसोहळ्याची चर्चा
अद्याप अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे हे तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. त्यामुळे रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. “११ वर्ष झाली. आयुष्यातील चढ-उतार, चांगल्या-वाईट सगळ्या प्रसंगांमध्ये या नेहमी बरोबर होत्या. आता हा आयुष्यातील नवीन प्रवास सुरु करताना त्यांचं बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. या माझ्यासाठी Happy Place आहेत. लव्ह यू अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे. मेहुल व सौरभला मिस केलं. माझं केळवण”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.