रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा संपन्न; खास फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 23, 2026 | 10:11 am
in Entertainment, Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka Sarkate engagement

खास फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

Anushka Sarkate engagement : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार रंगत आहे. दोघांच्या नात्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून त्यांच्या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे बारकाईने लक्ष आहे. दरम्यान नुकताच अनुष्का आणि निखिल यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला आहे. याशिवाय अनुष्काचा मेहंदी सोहळा ही पार पडला होता. या सोहळ्यातील सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अनुष्काच्या मेहंदी लूकचे तसेच तिच्या आनंदी क्षणांचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरपुड्याच्या या खास सोहळ्यात अनुष्का आणि निखिल दोघेही अतिशय देखण्या आणि आकर्षक अंदाजात दिसून आले. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या लूकने उपस्थितांचे तसेच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनी एकमेकांना अंगठी घालत आपल्या नात्याला नवे स्वरूप दिले. या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून ते फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमध्ये हा आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला. साखरपुड्यातील प्रत्येक क्षण विशेष असल्याचे फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. अनुष्का आणि निखिल यांची सुंदर केमिस्ट्री, एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि आनंदी स्वभाव चाहत्यांच्या मनाला भावला आहे.

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर येताच चाहत्यांनी कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. अनेकांनी या जोडीला “मेड फॉर इच अदर” असे म्हटलं आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या पुढील विधी आणि सोहळ्यांचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांसह संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाकडून शुभेच्छा मिळत आहेत. आता त्यांच्या लग्नसोहळ्याचे आणखी काही खास फोटो आणि क्षण पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

Tags: Anushka Sarkate engagementmarathi actressmarathi entertainment newsmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Anushka Sarkate And Nikhil Chavan

हळद लागली! अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोरदार हळद, मंडपातच नवरा-नवरीचा भन्नाट डान्स अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.