टेलिव्हीजनवरील ‘कपिल शर्मा शो’ हा चांगलाच चर्चेत राहिला. या कार्यक्रमामधून कपिल शर्मा हा चांगलाच नावारुपास आला. यामध्ये नवजोत सिंह सिद्धू हे परीक्षक म्हणून दिसून आले होते. त्यांच्या शायरी करण्याच्या अंदाजांचे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी त्यांनी क्रिकेट विश्वातही नाव कमावले आहे. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धू यांच्या पत्नीला कर्करोग असल्याचे समजले होते. त्याबद्दल केलेल्या विधानामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची पत्नी नवजोत कौर यांना संतुलित आहारामुळे लवकर बरे होता आले असे त्यांनी सांगितले होते. तसेच जीवनशैलीमध्ये बदल केल्याने ४० दिवसांतच तब्येतीमध्ये सुधारणा झाली असल्याचा दावाही त्यांनी केला होता. (kapil sharma and navjot singh siddhu get notice)
नवजोत यांनी केलेल्या या दाव्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. कर्करोग उपचाराशिवाय कसा बरा होऊ शकतो? असा प्रश्नही काही डॉक्टरांना पडले होते. यावरुनच आता कपिल व सिद्धू यांना अभिनेत्री व कर्करोगातून बऱ्या झालेल्या रोजलिन खान यांनी कायदेशीर नोटिस पाठवली. तसेच त्यांनी सार्वजनिक स्वरूपात सगळ्यांची माफी मागावी अशी मागणीदेखील केली आहे.
रोजलिन यांनी केलेल्या नोटिसमध्ये कपिल व नवजोत यांनी कर्करोगासंबंधित चुकीची माहिती दिली आणि हे सांगून ते लोकांना भटकवत असल्याचे म्हंटले आहे. ‘दैनिक भास्कर’च्या रिपोर्टनुसार, रोजलिनचे वकील अली कासिफ खान देशमुख यांनी सांगितले कि लिंबाची पानं पाण्यात उकळून प्यायल्यास कर्करोगावर मात करता येते असा असा दावा केला होता. तसेच हळदीच्या वापरामुळेही हा रोग बरा झाल्याचे सांगितले मात्र या सगळ्याला विज्ञान पाठिंबा देत नाही असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
रोजलिन स्वतः कर्करोगातून बरी झाली आहे. त्यामुळे खोटे दावे करुन प्रेक्षकांना चुकची माहिती देऊ नये. असे केल्यास लोक उपचारांवर विश्वास ठेवणार नाहीत. ‘कपिल शर्मा शो’ कोट्यावधी लोक बघतात. त्यामुळे कोणताही दावा करताना विचार करा असे रोजलिनने म्हटलं आहे. या नोटिसमध्ये रोजलिनने तीन मागण्या गेल्या आहेत. “पहिली मागणी म्हणजे सर्वांच्या समोर कपिल व सिद्धू यांनी माफी मागावी, दुसरी मागणी म्हणजे हा एपिसोड काढून टाकावा, तसेच तिसरी मागणी म्हणजे हे सगळं त्यांनी १४ दिवसांच्या आत करावं”. दरम्यान या नोटिसला कपिल व सिद्धू काय उत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.