रंग माझा वेगळा या मालिकेत सध्या कार्तिक दीपाचा बदला घेण्याच्या भावनेत आहे. त्यासाठी तो अनेक कारस्थान करताना मालिकेत पाहायला मिळतो आहे. यातच गेले अनेक दिवस मालिकेचा प्रोमो चर्चेत आहे.त्यात कार्तिक दीपा वर गन रोखतो. त्या संबंधात आजच्या भागात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो.(Rang Maza Vegala Latest Update)
दीपा कार्तिकच्या बॅग मधून गन घ्यायला जाते तेव्हा कार्तिक तिच्या कडून बॅग खेचून घेतो. त्या नंतर दीपा त्याच्या समोर गन घेऊन जाते आणि त्याला देते. आणि ती त्याला म्हणते कि कार्तिक मला माहित आहे तू इथे मला मारून टाकण्यासाठी घेऊन आला आहेस. तू जे करायला आला आहेस, ते कर मारून टाक मला, दीपचं हे बोलणं ऐकून कार्तिक तिच्यावर गण रोखतो. परंतु तो गोळी झाडत नाही, आणि रडायला लागतो, तेव्हा दीपा त्याला म्हणते की मला माहित होत कि माझा कार्तिक मला कधीच मारू नाही शकत. तेवढ्यात कार्तिक पुन्हा तिच्यावर गन रोखून धरतो.
पाहा काय घडलं ? (Rang Maza Vegala Latest Update)
आणि एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो. कार्तिक दीपाला म्हणतो बरोबर आहे तुझं. मी तुला कधीच मारू नाही शकत. आणि ही गन इथे दीपाला मारण्यासाठी नाही तर कार्तिकला मारण्यासाठी आणली आहे. आणि कार्तिक स्वतःवरच गोळी झाडतो. दीपा खूप घाबरते आणि आणि लगेच त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. तितक्यात तिला सौंदर्याचा फोन येतो आणि दीपा तिला कार्तिकला गोळी लागल्याचं सांगते.तेव्हा सौंदर्या त्याला आदित्य हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगते.तर हॉस्पटिल मध्ये घाडगे वकिलांना बघून कार्तिकी अस्वस्थ असते.(Rang Maza Vegala Latest Update)

हे देखील वाचा : पुन्हा अनिरुद्धवर आशुतोषला शंका,अरुंधती देणार आशुतोषची साथ वीणा आणि अनिरुद्धच्या बिझनेसवर होणार परिणाम?
कार्तिकच्या या अशा अचानक वागण्याने नवीन वादळ आलं आहे. कार्तिक या प्रसंगातून वाचेल का? दीपा या सर्वातून कशी बाहेर पडणार या प्रश्नांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.