रंग माझा वेगळा ही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक वेगवगेळी वळण या मालिकेत पाहायला मिळाली.दीपा आणि कार्तिकच्या नात्याने अनेक चढउतार पहिले. सध्या या मालिकेत एक वेगळं वळण पाहायला मिळत आहे. कार्तिक जेल मधून सुटल्यापासून दीपाचा सूड घेण्याची भावना त्याने बाळगली आहे, आणि गोडं बोलून तो दीपाचा काटा काढण्याच्या प्रयत्नात आहे. (Rang Maza Vegala New Promo)
कालच्या भागात कार्तिक आणि दीपा बाहेर जाण्यासाठी निघतात, आणि एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. पंरतु बोलता बोलता दीपा कार्तिकला टोमणे मारत असते. फार्महाउसला पोहचल्या नंतर दीपा कार्तीकडे लक्ष ठेवून असते. आणि तेव्हा ती त्याला जुन्या आठवींबद्दल आठवण करून देते. तर देशमुख बाई घाडगे वकिलांना आदित्य हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यामुळे आर्यन वर चिडते आणि आर्यनला हा घोळ निस्तरायला सांगते.तर घरी श्वेता कार्तिकीला बोलण्यात गुंतवून आर्यनचा पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न करते.तर हॉस्पिटल मध्ये घाडगे वकील त्रागा करत असतात तेव्हा दीपिका त्यांना त्यांच्या आजाराबद्दल सांगते.आणि दीपिका त्यांची घेत असेलीला काजळीमुळे ते भावुक होतात.
पाहा काय घडलं ? (Rang Maza Vegala New Promo)
सध्या कार्तिक दीपाला बाहेर फिरायला घेऊन गेला आहे, तिकडे तो दिपाचा जीव घेण्याच्या उद्देशाने गेला आहे, अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यात दीपा कार्तिकची खेळी उधळून लावते, ती स्वतःच त्याला गन देऊन तिचा जीव घ्यायला सांगते, कार्तिक दीपावर गन रोखतो परंतु तो गोळी झाडत नाही, आणि रडू लागतो, तेव्हा दीपा म्हणते मला माहित होत माझा कार्तिक मला नाही मारू शकत, कारण तुला ते जमलं असत तर तू आधीच करू शकला असतास.(Rang Maza Vegala New Promo)
हे देखील वाचा : ‘शेतकरीच नवरा हवा’ मालिकेत पाहायला मिळणार रेवा आणि सयाजीच्या लग्नाची धामधूम
आता दीपा आणि कार्तिक एकत्र येणार, की कार्तिक त्याची नवीन खेळी खेळतोय हे बघणं रंजक ठरणार आहे.कार्तिकच्या स्वभावाचं सध्या अंदाज लावणं कठीण आहे.जर ही कार्तिकची नवीन खेळी असेल तर दीपा या जाळयात पुन्हा अडकेल का या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.