स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात अनेक शूर वीरांनी आपलं बलिदान दिलं. त्यापैकी अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर पुस्तकं लिहिण्यात आली, चित्रपट बनवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर सुद्धा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात आलं होत. त्याच प्रमाणे या चित्रपटाचा टिझर सुद्दा नुकताच लाँच करण्यात आला आहे.(Savarkar Teaser Viral)

रणदीप हुडा ने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून #whokilledHisStory असा हॅशटॅग देत हा टिझर लाँच केला आहे. लाँच करण्यात आलेल्या टिझर मध्ये ” “गांधीजी वाईट नव्हते, पण जर ते त्यांच्या अहिंसेच्या तत्वावर अडून राहिले नसते तर भारताला ३३ वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळालं असतं.” असा डायलॉग ऐकयला मिळतोय. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही सोबतच इतर कलाकारांच्या भूमिका देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
संपूर्ण टिझर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Savarkar Teaser Viral)
https://www.instagram.com/reel/CsyHpNVg17E/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
या चित्रपटाचे दिगदर्शन महेश मांजरेकर करणार होते पण काही कारणास्तव त्यांना हा चित्रपट सोडावा लागला आणि अभिनय सोबतच सावरकर या चित्रपटाचे दिगदर्शन सुद्दा रणदीपच करणार असल्याची माहिती मिळाली आहे.