चित्रपट येणं आणि वादाच्या भोवऱ्यात अडकून हे काही पहिल्यांदा घडत नाही. पण तरीही चित्रपटाची कथा जस जशी त्या बद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजातून येत रहातात. द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत देखील असच काहीस घडलं आहे .(Kamal Haasan on Kerla Story)
विविध स्तरातून आलेल्या टीकांनंतर आता प्रसिद्ध अभिनेते कमल हसन आणि अनुराग कश्यप यांनीही या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. iifa अवॉर्ड्स मध्ये कमल हसन यांना द केरळ स्टोरी या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हा खोटा दावा असल्याचे सांगितले दिगदर्शकानी खोटा प्रचार केला त्यामुळे अनेक स्तरांमध्ये अपप्रचार होऊंन जनतेत गैरसमज पसरला. चित्रपटाच्या शेवटी सत्य घटनेवर आधिरीत लिहून चित्रपट खरा होत नाही त्या साठी कथा, घटना देखील सत्य असाव्या लागतात अशा खरमरीत शब्दात कमल हसन यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली.
टीकेला निर्मात्यांचं प्रतिउत्तर(Kamal Haasan on Kerla Story)
तर अनुराग कश्यप यांनी देखील या चित्रपटाला कडाडून विरोध केला. अनेक चित्रपट राजकारणाला बळी पडत आहे. द केरळ स्टोरी देखील एक प्रोपगांडा आहे. हा एक प्रचारात्मक चित्रपट आहे या विधानाशी मी सहमत आहे. असं देखील अनुराग कश्यप म्हणाले.
कमल हसन आणि अनुराग कश्यप यांच्या टीकेवर सुदिप्तो सेन यांनी देखील उत्तर दिले आहे. टीकेला प्रतिउत्तर देताना सुदिप्तो म्हणाले काही लोक चित्रपट न पाहता यावर टीका करतात. तामिळनाडू मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही त्यामुळे त्यांनी तो पहिला नाही. त्यामुळे मी त्यांना उत्तर द्याल बांधील नाही.क मी आधी समजावत बसायचो आता मी समजावत बसत नाही असं देखील सुदिप्तो सेन म्हणाले.(Kamal Haasan on Kerla Story)