शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, म्हणाला, “तू नेहमीच मला…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 18, 2024 | 3:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Tharla Tar Mag Fame Amit Bhanushali thanked his wife by with sharing special photo

'ठरलं तर मग'मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, म्हणाला, "तू नेहमीच मला..."

गेले काही दिवस छोट्या पडद्यावरील एका पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तो पुरस्कार सोहळा म्हणजे ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२४’. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. त्यामुळे या वाहिनीचे प्रेक्षक वाहिनीच्या या खास पुरस्कार सोहळ्यासाठी कायम उत्सुक असतात. या पुरस्कार सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार?, सर्वोत्कृष्ट जोडी कोण ठरणार?, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री पुरस्कार कोणी जिंकणार? यासाठी प्रेक्षकांमध्ये कायमच उत्सुकता असते.

अशातच काल (१७ जानेवारी) नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये ‘ठरलं तर मग’ या मालिकेची चांगलीच हवा पाहायला मिळाली. ‘महाराष्ट्राची महामालिका’, ‘सर्वोत्कृष्ट परिवार’ आणि ‘सर्वोत्कृष्ट जोडी’ असे पुरस्कार जिंकले आहेत. गेल्या वर्षभरापासून स्टार प्रवाहवर ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे यंदाच्या ‘स्टार प्रवाह महामालिका’ या पुरस्कारावर ‘ठरलं तर मग’ने नाव कोरलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

आणखी वाचा – शाहरुख खानच्या लेकीचा बाथटबमधील व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, सुहाना खानला सुनावलं, म्हणाले, “रमजानमध्ये तरी लाज बाळगा”

तर ‘सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी’ हा पुरस्कारही या मालिकेच्या जोडीला मिळाला आहे. सायली-अर्जुन म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशालीला मिळाला आहे. यानिमित्त अमितने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या पुरस्कारासाठी त्याने आपली बायकोचे आभार मानले आहेत. “माझे अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू मला कायम पाठिंबा आणि प्रोत्साहन दिला आहेस” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – विमानतळावर असलेल्या टीव्हीवर सुरु होता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, ‘ते’ दृश्य पाहून भारावले समीर चौघुले, सेल्फीही घेतला अन्…

दरम्यान, अमितने त्याच्या बायकोला किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच त्याने शेअर केलेल्या फोटोवर चाहते मंडळींनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन, दोघेही खूप सुंदर दिसत आहात, तू खूप भारी दिसत आहेस, हा पुरस्कार तुलाच मिळायला पाहिजे होता” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी अभिनेत्याचे कौतुकही केले आहे.   

Tags: amit bhanushalimarathi entertainment newsTharla Tar Mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Javed Akhtar On First Wife

"माझ्या दारुच्या व्यसनामुळे…", पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, "आमचं नातं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.