राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणांवर ती नेहमीच तिचे मत व्यक्त करत दिसते. बरेचदा पापराजींसह ती गमती-जमती करताना दिसते. अशातच राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंतने तिचा माजी पती रितेशबरोबर पॅचअप केल्याचे दिसत आहे. बऱ्याच दिवसांनी दोघेही पुन्हा एकत्र दिसले. यावेळी एकत्र असताना दोघांनी आदिल खान दुर्रानी यांना खडसावले आणि सोमी खानला सल्ला दिला. राखीने सोमीला तिचे दागिने सुरक्षित ठेवण्यास आणि आंघोळ करताना काळजी घेण्याचा संदेश दिला. (Rakhi Sawant With EX Husband Ritesh)
राखी सावंत व रितेशने ‘फिल्मीमंत्र मीडिया’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना राखी सावंतने आदिल खान दुर्रानी यांची पत्नी असलेल्या सोमी खानला सल्ला देत म्हटलं की, तिच्या नावावर कोणतीही मालमत्ता ठेवू नको. राखीने यावेळी असाही आरोप केला की, “तो माझे सर्व दागिने घेऊन पळून गेला. रितेशने मला भेट म्हणून दिलेले दागिने त्याने पळवले. माझ्याकडे साडेतीन कोटी रुपयांचा चेक आहे. जो बाऊन्स झाला आहे”.
यानंतर रितेश म्हणाला, “आम्ही सोमीला सांगू इच्छितो की, तू तुझ्या पैशांचा ताबा त्याला देऊ नकोस. आणि त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता करु नकोस. अशी अनेक प्रकरणे आहेत जी हळूहळू उघड होतील. हे प्रकरण राखीच्या मानसिक छळाचे होते. राखीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ती आत्महत्या करु शकते”. यानंतर राखीने सोमीला बाथरूममध्ये आंघोळ करताना काळजी घेण्यास सांगितली. तो एक शिकारी आहे आणि अनेक व्हिडीओ बनवतो आणि इतर देशांमध्ये पाठवतो. राखी म्हणाली, “त्याने माझे व्हिडीओ बनवले आहेत. आणि याबाबत मी पोलिसांना माहिती दिली आहे”.
राखी व आदिलने आधी लग्नाचा दावा केल्याची माहिती आहे. यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले, त्यानंतर त्याला तुरुंगात जावे लागले. अलीकडेच आदिलने असा दावा केला की, राखीवर अनेक खटले दाखल आहेत, त्यामुळे राखीला तुरुंगात जावे लागेल.