अभिनेत्री राखी सावंत ही सर्वात चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. कधी तिचे वक्तव्यांनी, तर कधी तिच्या ड्रामासाठी. त्यामुळेच तिला ‘ड्रामा क्वीन’ अशी ओळख मिळाली आहे. मात्र, मध्यंतरी ती तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल दुर्रानीबरोबरच्या सुरु असलेल्या वादामुळे बरीच चर्चेत आली आहे. दोघांनी त्यावेळी एकमेकांवर आरोप केले होते. हा वाद अजूनही सुरु असून याबाबतची अनेक खुलासे समोर येत आहे. (Rakhi Sawant talks with Mukesh Ambani)
अशातच राखी सावंत नुकतीच एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी नुकतीच अंधेरीतील एका जिमबाहेर दिसली होती. त्यावेळी जिमबाहेर पडताना राखीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा फोन आला होता. त्याचबरोबर ती नीता अंबानी यांच्याशी देखील बोलताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – Video : बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, राखी ही जिममधून बाहेर पडताना दिसते. तेव्हा समोर असलेल्या पापाराझींशी बोलताना तिला अचानक मुकेश अंबानींचा फोन येतो. तो फोन उचलताच राखी त्यांची विचारपूस करते. पुढे ती नीता अंबानी यांच्याशी बोलत आहे. हे होत असताना तेथील पापाराझीं अभिनेत्रीला तिचा फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगतात. तेव्हा राखी त्यांना सांगते की, “एक मिनिटं थांबा, मीडियाला तुमच्याशी बोलायचं”. तेव्हा राखी तिचा फोन स्पीकरवर ठेवताच समोरचा फोन कट झालेला या व्हिडिओत पाहायला मिळतो. फोन कट झाल्यानंतर राखी उपस्थित पापाराझींची फिरकी घेताना दिसते. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – दमदार डायलॉग, धमाकेदार अॅक्शन आणि…; टायगर श्रॉफच्या बहुचर्चित ‘गणपत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज
राखीने आजवर अनेक चित्रपट व रिऍलिटी शोजमध्ये दिसली आहे. याशिवाय, ती अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट होताना दिसली. मागे राखीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आईच्या उपचारासाठी मुकेश अंबानी यांनी मदत देऊ केली होती.