आपण कधी कधी आयुष्यात शक्य नसलेल्या गोष्टींची कल्पना करत असतो. पूर्ण न होणारी पण मनाला सुखावणारी ती कल्पना असते. कंपनांच्या विश्वात जाऊन ह्यात नसलेल्या व्यक्तींना फोन लावण्याची संधी मिळाली आहे राज ठाकरे यांना.(Raj Thackeray)
झी मराठी वरील खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी आपलं पुनरागमन करतोय आणि या कार्यक्रमात पहिली अतिथी असणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे. आणि या कार्क्रमात मुख्य निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे गायक अवधूत गुप्ते. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोश सध्या सगळीकडे चांगलेच वायरल होतायत असाच आणखी एक प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे ज्यामध्ये राज ठाकरे थेट छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.
वाचा नक्की काय आहे प्रकरण(Raj Thackeray)
कार्यक्रमात अवधूत राज ठाकरे यांना सांगतो हा जादूचा फोन आहे यातून तुमच्या मनात असलेल्या व्यक्तीला फोन लागणार आहे तेव्हा राज ठाकरे म्हणतात ” मी छत्रपती शिवाजी महाराज यांना फोन लावू इच्छितो आणि त्यांना मला सांगायचं आहे कि या धरतीवर तुम्ही परत या विशेष करून या महारातष्ट्रात तुम्ही पुन्हा जन्म घ्या आणि इथल्या मराठी माणसांना सांगा तुम्ही नक्की कशा साठी झगडला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करत राज ठाकरे काय म्हणाले ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
https://www.instagram.com/reel/Cs5jZJ9gIzf/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अनेक राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या आठवणी अशा अनेक मुद्यांवर राज ठाकरेंनी या कार्यक्रमाच्या मार्फत भाष्य केल्याचं दिसून येतंय. खुपते तिथे गुप्ते हा जारकर्म तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा सुरु होत आहे. येत्या ९ जूनला या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होतोय. राज ठाकरे यांच्या सोबतच अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात असणार असल्याच्या सर्वत्र रंगत आहेत.