केके म्हणजे गायक कृष्णकुमार कुन्नथ. यांच्या गाण्यांनी काळ गाजवला.त्यांचा एक वेगळा इराच त्यांनी निर्माण केला. प्रेम, विरह अशी प्रत्येक भावना ते अक्षरशः कोळून प्यायले आहेत. त्यांच्या अनपेक्षित मृत्यूने प्रेक्षक आणि सिनेसृष्टी अक्षरशः हळहळली.बघता बघता दिवस कसे निघून गेले ते कळलं ही नाही. ३१ मे २०२३ केके यांचे प्रथम पुण्यतिथी.(KK First Death Anniversary)
गेल्या वर्षी केकेचं कोलकत्यात एक कॉन्सर्ट सुरु होत,आणि सुरु कॉन्सर्ट मध्येच केके अचानक खाली पडले. त्यांची तब्येत खालावली. आणि त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात पोचल्या नंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचा हा अचानक झालेला मृत्यू सगळ्यांसाठीच फार अनपेक्षित होत.
पाहा कोणतं आहे केकेचं शेवटचं मराठी गाणं?(KK First Death Anniversary)
केकेनी विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.हिंदी मध्ये तर केकेचा एक वेगळा फॅन बेस आहे.पण हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तेलगू, मल्याळम, आसामी इत्यादी भाषांमध्ये ही त्यांनी काम केलं आहे.त्यामुळे प्रत्येक भाषांमध्ये केकेचे फॅन्स आहेत. त्यांच्या मराठी फॅन्स साठी मात्र एक खास गोष्ट केके मागे सोडून गेले आहेत.त्यांचं शेवटचं गाणं मराठी मध्ये आहे.(KK First Death Anniversary)
हे देखील वाचा : जुन्या व्हिडिओमुळे मलायका अरोराच्या वयाबद्दल झाला खुलासा.-पाहा काय आहे मलायकाचं खरं वय
अम्ब्रेला या चित्रपटातून केकेचं मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आत पर्यंत पाहिलेले केके आणि या मराठी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार केके कसे असतील याची उत्सुकता नक्कीच आहे.केके यांनी मराठी फार काम केलं नसेल तरी त्यांचं शेवटचं गाणं मराठी मध्ये आहे, ही त्यांच्या मराठी फॅन्स साठी नक्कीच एक भावनिक गोष्ट आहे.त्यामुळे त्यांच्या सर्व गाण्यांमध्ये हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या जवळच असेल.