‘टाईमपास’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेश नुकताच नुकताच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. गेले काही दिवस प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रथमेश त्याची बायको क्षितिजाने लग्नात खास लूक केला होता. त्यांच्या हळदी, संगीत व लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. क्षितिजाने तिच्या लग्नातील उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रथमेशचे नाव घेत क्षितिजाने हटके उखाणा घेतलं असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा हटके उखाणा घेत तिने असं म्हटलं की, “हृदयी वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी, डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डिपी. प्रेम आमचं खरं आहे, नाही थिल्लर टाईमपास, प्रेमाच्या परीक्षेमध्ये दोघांनीही मिळवले १०० टक्के नाही झालं कुणी ३५ टक्के काटावर पास. जोडी आमची टकाटक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकंही काढतात फोटो शंभर. ढिंशक्याव धुमधडाक्यात पार पडला होता साखरपुडा, मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुडा. लग्नही झालं आज थाटामाटात झालो आम्ही उर्फी आयुष्यभर एकमेकांना भरवू आनंदाने बर्फी. प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची प्रेक्षकांच्या मनावर आहे एक गोड जरब, आता माझीही नव्याने ओळख करुन देते सौ. क्षितीजा प्रथमेश परब”.
आणखी वाचा – गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा मोठा निर्णय, गरोदर आहे आई, लवकरच देणार बाळाला जन्म
दरम्यान, क्षितिजाच्या उखण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये तिचा हा उखाणा आवडला असल्याचेही म्हटले आहे.