शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! भीषण रस्ते अपघातात ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने गमावला जीव, चार भोजपूरी कलाकारांचाही समावेश, एकूण नऊ जणांचा मृत्यू अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 27, 2024 | 3:40 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
aachal tiwari died

धक्कादायक! भीषण रस्ते अपघातात 'पंचायत' फेम अभिनेत्रीने गमावला जीव, चार भोजपूरी कलाकारांचाही समावेश, एकूण नऊ जणांचा मृत्यू अन्…

सिनेसृष्टीत एकामागोमाग एक धक्का देणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. नुकतीच ज्येष्ठ गायक व गझलकार पंकज उधास यांच्या निधनाने संपूर्ण संगीतक्षेत्र व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दीर्घ आजाराने त्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या पाठोपाठ आता सिनेसृष्टीतून आणखी एक निधनाची बातमी समोर आली आहे. ‘पंचायत २’ या वेबसीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री आंचल तिवारी हिचा मृत्यू झाला आहे. रस्ता अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. (anchal tiwari died)

आंचल भोजुपरी इंडस्ट्रीतही खूप सक्रिय होती. या अपघातात आणखी एका भोजपुरी अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव व गायक छोटू पांडे यांचाही मृत्यू झाला. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार कलाकारांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. बिहार येथील कैमूरमधील देवकाली गावाजवळ जीटी रोड येथे रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. त्यांनतर सोमवारी सकाळी मृतांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी एक निवेदन जारी करत मृत्यूला दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा – वडील दारूच्या आहारी, लोकांची भांडी घासायची अन्…; ‘डान्स दिवाने’मधील वर्षा सोळंकीने सांगितली घरची परिस्थिती, प्रेक्षकांनाही अश्रू अनावर

View this post on Instagram

A post shared by Anchal Tiwari (@anchalt555)

आंचल तिवारीने ‘पंचायत २’ मधील मुख्य अभिनेत्री रिंकीची मैत्रीण रवीनाची भूमिका साकारली होती. मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी सांगितले की, सोमवारी मृतांची ओळख पटली असून भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ ​​छोटू पांडे यांच्याही मृत्यूचा यांत समावेश आहे.

आणखी वाचा – नीट कमाई नसल्यामुळे बायकोच्या घरच्यांना टेन्शन अन्…; श्याम राजपूत यांनी सांगितली त्यांची लव्हस्टोरी, म्हणाले, “माझ्या बायकोने…”

यावेळी अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व कलाकार कारने प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा व बागिश पांडे यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम त्यांच्या कार व मोटरसायकलची टक्कर झाली, त्यामुळे दुचाकी कारच्या बाजूच्या दुसऱ्या लेनमध्ये गेली. त्यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालकासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

Tags: aachal tiwariaachal tiwari deathaachal tiwari diedchotu pandey deathentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Pankaj Udhas wife and daughters entered the crematorium to pay their last rites

Video : पंकज उधास यांना शेवटचं पाहताना पत्नीची वाईट अवस्था, मुलींनी धरुन आणलं अन्...; कुटुंबियांची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.