शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् चालू नाटकातच शरद पोंक्षे सर्वकाही विसरले, पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊन रडू लागले आणि…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 30, 2024 | 11:16 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Purush play Sharad Ponkshe blank and forgot everything actor said that this happened only once in his 40 years of career

‘पुरुष’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेते शरद पोंक्षे सर्वकाही विसरले अन्...; ४० वर्षांच्या कारकर्दीत हे पाहिल्यांदाच घडल्याची प्रांजळ कबुली

कला क्षेत्रात काम करताना अनेक मराठी कलाकारांचा रंगभूमीवरचा व्यासंग हा दांडगा असतो. रंगभूमीवरचा वावर, देहबोली, अभिनय आणि यासाठीके चोख पाठांतर यासाठी मराठीतील अनेक कलाकारांची नावे आदराने घेतली जातात आणि यामध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नावही घेतले जाते. मात्र अशा कलाकाराकडून कधी तरी चूक होते आणि ज्याचे त्यांना खूप वाईट वाटतं. जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती आणि आता सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना या नाटकाची पर्वणी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. (Purush play Sharad Ponkshe blank)

या नाटकाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका प्रयोगादरम्यान रसिकांना वेगळाच अनुभव आला. हा अनुभव म्हणजे नाटक रंगात आलं असताना एका प्रवेशानंतर अभिनेते शरद पोंक्षे अचानक सर्वकाही विसरले, स्तब्ध झाले आणि थांबले. श्रुती अगाशे या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रसिकप्रेक्षकांनी नाट्यगृह गच्च भरलेलं असताना मंचावर असलेले पोंक्षे सर्वकाही विसरून गेले. यावेळी ते म्हणाले की, “रसिकहो.. मी पुरता ब्लँक झालो आहे. मला काहीच आठवत नाही. मला जरा वेळ द्याल का?”. त्यावेळी सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना संमती दिली. पुढे प्रयोग रद्द झाल्याचं घोषित केलं गेलं. पण प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन पोंक्षे पुन्हा मंचावर आले.

View this post on Instagram

A post shared by Shruti Agashe (@subakthengani)

आणखी वाचा – “प्राजक्ताच्या समर्थनार्थ काही?” नेटकऱ्याचा गश्मीर महाजनीला थेट प्रश्न, अभिनेता उत्तर देत म्हणाला, “हे संपूर्ण प्रकरण…”

आतापर्यंतच्या त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं झाल्यामुळे पोंक्षेंना यावेळी गहिवरून आलं होतं. पण प्रेक्षकांनी त्यांना थांबवलं आणि आतापर्यंतचा प्रयोग उत्तम झाल्याचं सांगत यापुढचे सगळे प्रयोग यशस्वी होतील अशा सदिच्छाही दिल्या. यावेळी प्रेक्षकांमध्ये नाराजी किंवा तक्रारीचा सूर जाणवला नाही. नाटकातील इतर कलाकारांनीही प्रेक्षकांचे आभार मानले. लेखिका आणि व्हॉइस ओव्हर कलाकार श्रुती आगाशेनं हाच अनुभव सांगणारा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि यावर शरद पोंक्षेंना पाठिंबा दिल्याचेही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सुरेश धस प्रकरणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, कारवाई करण्याचे आदेश, न्याय मिळणार का?

दरम्यान, ८० च्या दशकात गाजलेल्या या नाटकानं स्त्री- पुरुष समानतेवर भाष्य करताना, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या अस्मितेचं प्रतिबिंब संवेदनशीलपणे मांडलं होतं. त्यातील संवाद, पात्रांच्या भावना आणि विषयाच्या सखोलतेमुळे ते नाटक मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड ठरले. नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं ही कलाकृती पुन्हा सादर होत आहे. 

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
anupama serial get trolled

सुप्रसिद्ध ‘अनुपमा’ मालिकेतील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “ही तर बी ग्रेड वेबसीरिज…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.