हिंदी टेलिव्हिजनवरील ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. या मालिकेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. तिची सावत्र मुलगी व तिच्यामधील वाद हे सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालेले दिसून आले. अशातच आता या मालिकेबद्दल एक नवा वाद निर्माण झाला आहे. या मालिकेतील काही दृष्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. आता नक्की काय झालं? कोणत्या दृष्यावर आक्षेप घेतला? याबद्दल जाणून घेऊया. (anupama serial get trolled)
‘अनुपमा’ मालिकेतील राही व प्रेम यांची जोडी खूप पसंत केली जात आहे. या मालिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राही व प्रेम एका ब्लॅंकेटमध्ये दिसून येत आहेत. मात्र हा सीन लोकांना आवडला नाही. एका नेटकऱ्याने लिहिले की, “पहिल्यांदा मला वाटलं की हा एकदा बी-ग्रेड चित्रपट सुरु आहे. पण ही तर ‘अनुपमा’ मालिका निघाली”.
पहले मुझे लगा की कोई B Grade की web series है,
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) December 29, 2024
पर ये तो #Anupama serial निकला
😮😮😮😮😮😮😮 pic.twitter.com/eZMBhBOEWd
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आता हे सगळं मालिकांमध्येदेखील व्हायला लागलं. आपल्या संस्कृतीची वाट लावली आहे आजकालच्या मालिकांनी”. अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “आजकालच्या मालिका बी ग्रेड चित्रपटांपेक्षा पुढे गेल्या आहेत…”. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच हा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
‘अनुपमा’ मालिका १३ जुलै २०२० रोजी ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर सुरु झाला होता. राजन शाही व दीपा शाही हे या मालिकेचे निर्माते आहेत. या मालिकेमध्ये रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. तसेच गौरव खन्ना, मदालसा शर्मा, सुधांशु पांडे असे दिग्गज कलाकार आहेत. सध्या या मालिकेमध्ये दुसरी पिढी दिसून येत आहे. संपूर्ण देशभरात या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे.