कलाकार म्हटलं की त्यांना ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. अनेकदा त्यांचे चाहते कलाकारांचे कौतुक करताना दिसतात तर काही वेळा ते त्यांना ट्रोल करताना दिसतात. कलाकारांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांच्या चाहते मंडळींचं लक्ष असतं. सोशल मीडियावरुन ही कलाकार मंडळी त्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यामुळे चाहते ही या कलाकारांह अनेकदा सोशल मीडियातर्फे संवाद साधताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिचं नावही आवर्जून घेतलं जातं. (Akshaya Hindalkar Video)
‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही सुरु झालेली मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे अक्षया म्हणजेच वसुंधरा घराघरात पोहोचली. अक्षयाच्या वसुंधरा या पात्राने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. जुनी बंध तोडून नव्या बंधांना स्वीकारत नवीन आयुष्य सुरु करणाऱ्या वसुंधराचा अनोखा असा प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. तर वसुंधराला आकाशची असलेली साथ ही प्रेक्षकांना अधिक भावत आहे. मालिकेतील ही सर्वांची लाडकी वसुंधरा म्हणजेच अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
अशातच अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया ‘अटल सेतू ब्रिज’वर लॉंग ड्राईव्हला गेलेली पाहायला मिळत आहे. आणि या लॉंग ड्राईव्ह दरम्यान डोकं बाहेर काढून हवेत केस फिरवत केलेल्या अक्षयाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अक्षयाला ट्रोल करत सल्ला दिला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अक्षयाने “guyz chill मी शूटिंग करताना सर्व खबरदारी घेतली आहे”, असं म्हटलं आहे. तरीसुद्धा अक्षयाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहे. या “चालत्या गाडीतून डोक बाहेर काढू नये”, “काळजीपूर्वक”, अशा कमेंट करत तिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे.